अनेक कुटूंबे सावरली पोलिसांनी शोधले हरविलेले १५२ पुरुष व २३९ महिला

अनेक कुटूंबे सावरली

पोलिसांनी शोधले हरविलेले १५२ पुरुष व २३९ महिला

          वाशिम, दि. ०९ (जिमाका) : पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या कुशल मार्गदर्शनात जिल्हयात पोलिस विभाग अनेक उपक्रम राबवित आहेत. महिला व मुलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची स्थापना करुन गरजूंना विहीत वेळेत मदत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच पिडीत व गरजू संकटकाळात सापडलेल्या व्यक्तींना तात्काळ मदतीसाठी  डायल ११२ ची स्थापना करण्यात आली असून त्याला नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महिला व मुलीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहे. जिल्हयात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. नियंत्रण कक्ष वाशिम येथे मिसींग डेस्क कार्यान्वीत करण्यात आला आहे.त्यामाध्यमातून हरविलेल्या महिला व पुरुषांचा शोध घेण्याकरीता सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे.

               जिल्हयात सन २०२१ मध्ये १८ वर्षावरील एकूण १८७ पुरुष हरविले. त्यापैकी १५२ पुरुषांचा शोध लावण्यात आला. हरविलेल्या २९० महिलांपैकी २३८ महिलांचा शोध लावण्यात आला आहे. मिसींग डेस्कव्दारे सन २०२१ या कालावधीत ५१ महिला,७ मुली, २ मुले व १४ पुरुषांचा शोध घेण्यात आला आहे. मिसींग डेस्कच्या कार्यवाही दरम्यान नियंत्रण कक्ष वाशिम येथून हरविलेल्या महिला व पुरुष यांचे तक्रारदारास प्रत्यक्ष संपर्क करुन महिला व पुरुष मिळाले किंवा कसे याचा तक्रारदार यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन दरमहा पाठपुरावा करुन शोध घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

               हरविलेल्या महिलांचे नातेवाईकास संपर्क करुन महिला घरी परत आली किंवा कसे याबाबत फोनव्दारे विचारणा केली असता पोलीस स्टेशन, मंगरुळपीर हद्दीतील मिसींग महिलाबाबत २२ सप्टेंबर २०२१ रोजी मिसींगची पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती. संबंधित मिसींग महिला ही १६ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलीसांनी परिश्रम करुन सदर महिलेचा शोध घेतला असता मिळून आली. पोलीस स्टेशन,अनसिंग हद्दीतील एक महिला ही तिचे लहान मुलांसह ५ एप्रिल २०२१ रोजी हरविली असता त्याबाबत पोलीस स्टेशन, अनसिंगला मिसींग दाखल करण्यात आली होती. हरविलेली महिला व तिच्या लहान मुलांचा पोलीसांनी परिश्रम करुन शोध घेतला. त्यांना त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात दिल्याने संबंधित तक्रारदार यांनी भावनिक होऊन पोलीसांनी जोपासलेली सामाजिक बांधिलकी आणि सहकार्यामुळे महिला घरी परत आल्यामुळे पोलीसांच्या या कार्यवाहीमुळे कुटुंबातील लोक आनंदित आहे.

             जिल्हयात १५ जानेवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत जिल्हयातील हरविलेले/पळविलेले मुले, मुली, महिला व पुरुष यांचे शोध कामी पोलीस स्टेशनस्तरावर अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस कर्मचारी यांचे विशेष शोध पथक तयार करण्यात आले आहे. 

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे