उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२१ प्रवेशिकास मुदतवाढ

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२१ 

 प्रवेशिकास मुदतवाढ

·       28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

          वाशिम, दि. १6 (जिमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार,समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्यास आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

           उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सदर संकेतस्थळावरुन विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.  राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात.तरी, प्रवेशिका 28 फेब्रुवारीपर्यंत सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

*****

 

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे