*सीएसआर निधीतून जिल्हा रुग्णालयाला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका व दोन व्हेंटिलेटर भेट*
*सीएसआर निधीतून जिल्हा रुग्णालयाला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका व दोन व्हेंटिलेटर भेट*
वाशिम दि.१५(जिमाका) भारत सरकारच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या जहाज बांधणी कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) जिल्हा सामान्य रुग्णालयाला नुकतीच एक अत्याधुनिक कार्डियक रुग्णवाहिका आणि दोन नियो नेटल वेंटिलेटर भेट म्हणून दिले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. धर्मपाल खेळकर,अन्य वैद्यकीय अधिकारी तसेच साथी संस्थेचे प्रतिनिधी रामेश्वर वानखेडे यांची उपस्थिती होती.
ही भेट साथी संस्था दिल्लीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणार्या गंभीर रुग्णाला यावेळी व्हेंटिलेटरचा उपयोग होणार आहे.कोरोना संसर्ग काळात व्हेंटिलेटर व अत्याधुनिक कार्डीयक रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता असताना या रुग्णवाहिकेचा उपयोग रुग्णाला दवाखान्यात उपचारासाठी आणण्यासाठी होणार आहे.या रुग्णवाहिकेच्या सुविधेमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला आराम मिळण्यास मदत होणार आहे.
Comments
Post a Comment