ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहीती द्यावी
ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहीती द्यावी
न्या.एस.पी.शिंदे
वाशिम,दि.१७ (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्तवतीने १६ फेब्रुवारी २०२२ रोजी श्री. शिवाजी हायस्कुल,वाशिम येथे " ज्येष्ठ नागरीकांसाठी असलेल्या विविध योजना " या विषयावर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविकातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.एस. पी. शिंदे यांनी जेष्ठ नागरिकांनी त्यांचे नातेवाईकांनी दिलेल्या कोणत्याही आमिषाला अथवा आश्वासनांना बळी पडु नये आणि त्यांनी त्यांची मिळकत नातेवाईकांचे नावे करुन देऊ नये असे सांगितले.
जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव अँड.एन.टी.जुमडे यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठीच्या विविध योजना या विषयावर उपस्थितांना महत्वपुर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमांचे सुत्रसंचालन विधीज्ञ संघाचे सहसचिव ऍड.कि.जे. सानप यांनी केले.उपस्थितांचे आभार शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुणराव सरनाईक यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी,कर्मचारी तसेच नागरीक उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment