महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार१४ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव मागविले

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार

१४ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव मागविले

          वाशिम, दि. ०९ (जिमाका) : सन २०२१-२२ या वर्षाकरिता जिल्हयातील वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक,शैक्षणिक व आर्थिकदृष्टया विकास होण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन व साहित्यीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यीक, समाज प्रबोधनकार व समाज सेवक व त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडुन महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरीता विहीत नमुन्यात १४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

              पुरस्कारासाठी व्यक्तीची पात्रता पुढीलप्रमाणे असावी.या योजनेनुसार वीरशैव-लिंगायत समाजाकरीता समाज कल्याण, समाज संघटनात्मक, कलात्मक, आध्यात्मिक प्रबोधन आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे तथा कल्याणासाठी झटणाऱ्या नामवंत, समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यीक असावेत. तसेच समाज सेवक पुरुष असल्यास वय ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. स्त्री असल्यास वय ४० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. समाज सेवक यांच्या समाज कार्याचा अनुभव कमीत कमी १० वर्षाचा असावा.

              संस्थेकरिता पात्रता पुढीलप्रमाणे असावी.समाजकल्याण क्षेत्रात वीरशैव-लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अध्यात्मिक विकास करणे, अन्याय निर्मुलन करणे, अंधश्रध्दा रुढी निर्मुलन करणे, सामाजिक न्याय मिळवून देणे, समाजाला आरक्षण व संरक्षण मिळवून देणे, सामाजिक व संघटनात्मक जनजागरण करणे इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना हा पुरस्कार दिला जाईल. संस्था पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट १९६० खाली संस्था नोंदणीकृत असावी. तसेच संस्थेचे वेळोवेळी लेखा परिक्षण झालेले असावे. संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रातील कार्य १० वर्षापेक्षा जास्त असावे. अर्जदाराने आपले प्रस्ताव ४ प्रतीत अर्जासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन वाशिम या कार्यालयात  १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करावे.

              अर्जासोबत विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटल्यात किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, स्वत:चे अलिकडील २ फोटो, पेपर कात्रणे, समाज कार्याची माहीती व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत. अर्जाचा नमुना सहायक आयुक्त कार्यालयामार्फत विनामुल्य देण्यात येईल.सदरहू अर्जाचा नमुना सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी २०२२ आहे. तरी या मुदतीतच अर्ज सादर करावेत. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, मारोती वाठ यांनी केले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर