*न्यायालयीन कामकाज करतांना विधिज्ञांनी कर्तव्यदक्ष असावे*

*न्यायालयीन कामकाज करतांना विधिज्ञांनी कर्तव्यदक्ष असावे* 
                       ऍड. एस.के.उंडाळ 
वाशिम दि.१३(जिमाका) विधिज्ञांनी पक्षकारांना सेवा देताना स्वतःचा आदर राहील असे काम करावे. न्यायालयीन कामकाज करताना विधिज्ञांनी कर्तव्यदक्ष असावे.असे प्रतिपादन ऍड.एस.के.उंडाळ यांनी केले.
             १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्तवतीने पॅनल विधीज्ञाकरीता आयोजित ऑनलाईन  प्रशिक्षणादरम्यान ऍड. उंडाळ बोलत होते.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.   
          ऍड.उंडाळ यांनी यावेळी विधिज्ञ म्हणून कोणत्या मूल्यांचे पालन केले पाहिजे तसेच विधिज्ञाचे न्यायालय,पक्षकार, विरुद्ध बाजूचा पक्षकार आणि पक्ष तसेच समाजाप्रती काय कर्तव्य आहे यावर देखील प्रकाश टाकला.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ऍड व्ही.जे. सानप यांनी केले.आभार एस के भुरे यांनी मानले. प्रशिक्षणाचा लाभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवरील विधिज्ञांनी घेतला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे