साखरा येथील मॉडेल स्कूलच्या बांधकामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

साखरा येथील मॉडेल स्कूलच्या बांधकामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

वाशिम दि.१७ (जिमाका) वाशिम तालुक्यातील साखरा येथे बांधण्यात येत असलेल्या मॉडेल स्कूलच्या बांधकामाला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी आज १७ फेब्रुवारी रोजी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, उपशिक्षणाधिकारी श्री.डाबेराव,जि. प.सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. पाटील यावेळी उपस्थित होते.
      साखरा येथून जवळच असलेल्या २४ एकर जागेत मॉडेल स्कूलची इमारत बांधण्यात येत आहे. २ कोटी ५० लक्ष रुपये निधी इमारतीच्या बांधकामासाठी प्राप्त झाला आहे.या निधीतून १८ वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू आहे.जून  २०२२ पर्यंत मॉडेल स्कूलच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी दिले.येणाऱ्या शैक्षणिक वर्षापूर्वी बांधकाम पूर्ण करण्यात यावे.बांधकामाचा दर्जा उत्तम असावा.बांधकामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड करू नये.मॉडेल स्कूलच्या अंतर्गत बांधण्यात येणारी रस्ते,वृक्षारोपणाची व पाणीपुरवठ्याची काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी श्री.षण्मुगराजन यांनी दिल्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे