मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज मागविले

मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज मागविले

वाशिम, दि. १६ (जिमाका)  केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासनाने १० हजार कोटींची तरतूद केली आहे. सदर रक्कम लघु औद्योगिक विकास, बँक ऑफ इंडियाकडे वर्ग करण्यात आली आहे. या बँकेने या रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाईल त्याला ही बँक हमी देईल. या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक यांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित २५ टक्के सबसीडी राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरिक्षणासाठी उपलब्ध आहे.

              या योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, वाशिम यांचेकडे शासन निर्णयात नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्ताव सादर करावा.असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे. 

******

 

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर