*आज 2 हजार 413 व्यक्तींचे लसीकरण*
*आज 2 हजार 413 व्यक्तींचे लसीकरण*
वाशिम दि.3 (जिमाका) जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.ओमीक्रोन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असताना नागरिक आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरसावले आहे.जिल्ह्यात आज 3 फेब्रुवारी रोजी 2 हजार 413 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 768 व्यक्तींनी व दुसरा डोस 1 हजार 472 व्यक्तींनी तर प्रिकॉशन डोस 173 व्यक्तींनी घेतला.
वाशिम तालुका : पहिला डोस - 361 व दुसरा डोस -397,प्रिकॉशन डोस- 53 असा एकूण 811, मालेगाव तालुका : पहिला डोस - 37 आणि दुसरा डोस - 116,प्रिकॉशन डोस-3 एकूण 156, रिसोड तालुका : पहिला डोस - 71 व दुसरा डोस - 270,प्रिकॉशन डोस-19 एकूण 360, कारंजा तालुका : पहिला डोस - 47 आणि दुसरा डोस -242,प्रिकॉशन डोस-30 एकूण 319, मानोरा तालुका : पहिला डोस - 43 व दुसरा डोस 125,प्रिकॉशन डोस-17 एकूण 185 आणि मंगरूळपीर तालुका : पहिला डोस - 209 आणि दुसरा डोस - 322 तर प्रिकॉशन डोस-51 असा एकूण 582 व्यक्तींना देण्यात आला.
Comments
Post a Comment