कृषी संकुलाचे बांधकाम विहित वेळेत पूर्ण करा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
कृषी संकुलाचे बांधकाम विहित वेळेत पूर्ण करा
वाशिम दि.१७ (जिमाका) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांच्यापर्यंत कृषीविषयक तंत्रज्ञान पोहचविण्यासोबतच त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील पहिले स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुल वाशिम येथे उभारण्यात येत आहे. या कृषी संकुलाचे बांधकाम विहित वेळेत म्हणजे ऑगस्ट २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
आज १७ फेब्रुवारी रोजी सुंदरवाटिका भागात बांधण्यात येत असलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या बांधकामाला जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी संबंधित यंत्रणेला वरील निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. मिठ्ठेवाड,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व कंत्राटदार श्री.जाधव यावेळी उपस्थित होते.
५ कोटी ४४ लाख रुपये निधीतून हे कृषी संकुल उभारण्यात येत आहे. या कृषी संकुलामध्ये प्रशिक्षण सभागृह, शेतमाल विक्री केंद्र, ग्रेडिंग अँड पॅकिंग, रायपनिंग चेंबर, प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज, महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र विश्रांतीगृह, शेतकरी बांधवांसाठी अडीच एकर जागेत विविध योजनांची प्रात्यक्षिके दाखविण्यात येतील.
Comments
Post a Comment