*जिल्हाधिकाऱ्यांकडून सुपखेला साठवण तलावाच्या कामाची पाहणी*

*जिल्हाधिकाऱ्यांकडून सुपखेला  साठवण तलावाच्या कामाची पाहणी*

 वाशिम दि.१७ (जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज १७ फेब्रुवारी रोजी वाशिम तालुक्यातील सुपखेला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.एल.एस. मापारी उपजिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.राजू कोठेकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री.व्ही.जी.घुगे व जलसंधारण अधिकारी आर.एन.इंगळे यावेळी उपस्थित होते.
             येत्या ३१ मार्चपूर्वी पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याचे काम पूर्ण करण्यात यावे. हे काम संबंधित कंत्राटदाराकडून चांगल्या पद्धतीने करण्यात यावे. कोणत्याही उणिवा ह्या कामामध्ये राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी यावेळी संबंधित विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.या तलावाचे साठवण तलावात रुपांतर या कामातून होणार असल्यामुळे आजूबाजूच्या जवळपास १६ हेक्‍टर शेतीला आठमाही सिंचनाची व्यवस्था हे काम पूर्ण झाल्यावर निर्माण होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे