अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निवासी शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निवासी शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश

२५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

          वाशिम, दि. ०९ (जिमाका) :  जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये इयत्ता १ ली व २ रीत प्रवेश  घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याकडुन प्रवेश अर्ज विनामुल्य प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालय तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत उपलब्ध आहे. कोणत्याही भुलथापांना बळी न पडता व कोणाच्याही माध्यमातुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन न घेता या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. तसेच नजीकच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून प्रवेश अर्ज प्राप्त करुन कार्यालयास सादर करावा. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतीम तारीख २५ फेब्रुवारी २०२२ आहे.

              इयत्ता १ ली व इयत्ता २ री मध्ये प्रवेश घेण्यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे. या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. पालकाने विद्यार्थ्यांचे नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकीत प्रत सादर करावी. जर विद्यार्थी दारीद्रय रेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमुद करावा. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा १ लाख रुपयाच्या आत असावी. इयत्ता १ लीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ६ वर्ष पुर्ण असावे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल. या योजनेचा लाभ घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकानी प्रवेश अर्जासोबत संमतीपत्र व दोन पासपोर्ट फोटो जोडावे. आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा/घटस्फोटीत/निराधार/परितक्त्या व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अनुसूचीत जमातीच्या विदयार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसल्याचे पुरावा म्हणून ग्रामसेवकाचा दाखला ग्राहय धरण्यात येईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकाकडून संमतीपत्र घेण्यात येईल. वर्ग २ साठी शिकत असलेल्या शाळेमधील मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र. आधार कार्डची झेरॉक्स प्रत विद्यार्थ्यांची जोडावी. अपुर्ण कागदपत्र असल्यास तसेच खोटी माहीती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे