Posts

Showing posts from July, 2018

‘मुद्रा’मुळे रणजित झाला स्वावलंबी…

Image
बेरोजगारीचे प्रमाण आज प्रचंड वाढले आहे. या वाढत्या बेरोजगारीमुळे सर्वांनाच रोजगार उपलब्ध करून देणे आज कठीण झाले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून बेरोजगार व गरजू व्यक्ती हा स्वावलंबी व्हावा, हे पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात साकारतांना दिसत आहे. वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील रणजित देवळे हा शिक्षीत तरुण मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी झाला आहे. रणजित... तसा भूमिहीन. घरी वडिलोपार्जित शेती नसल्यामुळे रणजितने ग्रामपंचायत जवळ सरकारी जमिनीवर केवळ १० हजार रुपयांची गुंतवणूक करून सन २००० मध्ये छोटे किराणा दुकान थाटून व्यवसायाला सुरुवात केली. आई, वडील, पत्नी व एका मुलासह संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी रणजितवर आली. निर्व्यसनी असलेला रणजित सुस्वभावी असल्यामुळे ग्राहक देखील त्याच्या दुकानातून किराणा खरेदी करू लागले. दिवसाला या व्यवसायातून त्याला सुमारे १८० रुपये नफा मिळू लागला. केवळ याच व्यवसायात समाधान न मानता काहीतरी जोडधंदा केला पाहिजे, हा विचार सतत रणजितच्या मनात घर करू लागला. पार्डी टकमोर हे गाव परिसरातील ८ ते १० गावांची

जिल्ह्यातील सर्व व्यापारी आस्थापनाधारकांना आवाहन

वाशिम , दि . २६ : राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत दि. २३ मार्च २०१८ पासून महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ ही अधिसूचना राज्यातील शहरी व ग्रामीण भागात लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कार्यरत असलेल्या व्यापारी आस्थापना मालकांनी ‘आपले सरकार’ ( www.aaplesarkar.gov.in ) या संकेतस्थळावर भेट देवून सूचना पत्र, नोंदणी प्रमाणपत्र विहित पध्दतीने संगणक प्रणालीद्वारे प्राप्त करून घ्यावे, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.   ज्या आस्थापनांमध्ये १० पेक्षा कमी कामगार कार्यरत आहेत, अशा आस्थापना मालकांनी नमुना-फ भरून सूचनापत्र प्राप्त करण्यास शासनाने कोणतेही शुल्क आकारलेले नाही. ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कामगार कार्यरत आहेत, अशा आस्थापना मालकांनी नमुना-अ भरून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंड अळी सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा ( फेरेामोन ट्रॅप) वापर करण्याचे आवाहन

          वाशिम दि. 26  :  शेंदरी बोंडअळी या पतंगवर्गीय किटकाची मादी एक विशिष्ठ प्रकारचा गंध वातावरणामध्ये सोडते त्यामुळे नर कीटक मादीकडे आकर्षित होतात. या तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतामधील नर पंतग पकडण्यासाठी फेरेामोन सापळे लावून मोठ्या प्रमाणात नर पंतग पकडण्यात येतात. त्यामुळे पुढील प्रजनन रोखण्यात मदत होते. या कीडींच्या संख्येचा अंदाज येण्यासाठी फेरोमोन ट्रॅप अर्थात कामगंध सापळे महत्वाचे साधन आहे. फेरोमोन सापळ्यात सलग तीन दिवस प्रति दिन 8 ते 10 नर आढळून आल्यास किटकनाशकांचा वापर करणे आवश्यक असते. जुलै मध्यानंतर कापसाचे पीक, पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. गुलाबी अळीचे जीवन चक्र खंडित करण्यासाठी व प्रादुर्भाव तात्काळ लक्षात येण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर प्रभावी ठरतो. या सापळ्यांचा वापर, कपाशी लागवडीपासून 45 दिवसांनी केल्यास किडीची संख्या लक्षात येते व त्यानुसार योग्य किटकनाशकांचा योग्यवेळी व योग्य प्रमाणात वापर करुन ही कीड नियंत्रणात येऊ शकते. फेरोमोन सापळ्यांच्या अभावी सुरवातीच्या अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव लक्षात न येण्याची शक्यता असत

अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
* एकबुर्जी धरणाच्या सांडव्याची उंची वाढविण्याचा प्रस्ताव सादर करा * पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी उर्वरित ५ कोटी रुपये निधी मिळणार * प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 'मिशन मोड'वर काम करण्याच्या सूचना * सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपास गती द्यावी नागपूर, दि. ०५ : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष जास्त आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण देखील कमी आहे. शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार व तिबार पिके घेण्यासोबतच त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यात अपूर्णावस्थेत असलेले सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आज विधान भवनातील मंत्री परिषद सभागृहात आयॊजीत वाशिम जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे,आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त