जिल्ह्यातील सर्व व्यापारी आस्थापनाधारकांना आवाहन
वाशिम, दि. २६ : राज्य
शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत दि. २३ मार्च २०१८ पासून महाराष्ट्र
दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ ही अधिसूचना
राज्यातील शहरी व ग्रामीण भागात लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील
ग्रामीण व शहरी भागात कार्यरत असलेल्या व्यापारी आस्थापना मालकांनी ‘आपले सरकार’ (www.aaplesarkar.gov.in) या
संकेतस्थळावर भेट देवून सूचना पत्र, नोंदणी प्रमाणपत्र विहित पध्दतीने संगणक प्रणालीद्वारे
प्राप्त करून घ्यावे, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.
ज्या आस्थापनांमध्ये १० पेक्षा कमी कामगार कार्यरत
आहेत, अशा आस्थापना मालकांनी नमुना-फ भरून सूचनापत्र प्राप्त करण्यास शासनाने
कोणतेही शुल्क आकारलेले नाही. ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कामगार
कार्यरत आहेत, अशा आस्थापना मालकांनी नमुना-अ भरून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून
घ्यावे, असे सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment