Posts

Showing posts from July, 2022

पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत आता १ ऑगस्टपर्यंत

Image
पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत आता १ ऑगस्टपर्यंत वाशिम दि.३० (जिमाका) प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२२ -२३ च्या खरीप हंगामात विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२२ पर्यंतचा कालावधी निश्चित केला होता.परंतु ३१ जुलै रोजी रविवार हा शासकीय सुट्टीचा दिवस येत असल्याने केंद्र शासनाने मार्गदर्शन सूचनेत व एका पत्रात नमूद केल्याप्रमाणे आता प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत आता १ ऑगस्ट २०२२ अशी निश्चित केली आहे.               तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन या योजनेत सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

अग्रणी बँक व्यवस्थापक निनावकर यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

Image
अग्रणी बँक व्यवस्थापक निनावकर यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप वाशिम,दि.२९ (जिमाका) जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने श्री.निनावकर यांना आज २९ जुलै रोजी सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला.        यावेळी श्री.निनावकर म्हणाले, अग्रणी बँकेचा व्यवस्थापक म्हणून काम करणे सेवा काळातला वेगळा अनुभव आहे.वेगवेगळ्या ठिकाणी काम केले.गरजु व ग्राहकांच्या कामांना प्राधान्य दिले.        यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक म्हणून नव्याने रुजू झालेले दिनेश बारापात्रे,जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे,मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत,आरसेटीचे संचालक रघुनाथ माने व विधी अधिकारी श्री.महामुने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प व भेट वस्तू देऊन श्री. निनावकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.       यावेळी श्रीमती आंबरे, श्री.कोकडवार,श्री.जुनेद,

काटेपूर्णा अभयारण्यात जागतिक व्याघ्र दिवस उत्साहात साजरा

Image
काटेपूर्णा अभयारण्यात जागतिक व्याघ्र दिवस उत्साहात साजरा   वाशिम दि.२९(जिमाका) वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, त्याबाबत जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे हा जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागील उद्देशाने आज २९ जुलै रोजी शेलुबाजार येथील लक्ष्मीचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन काटेपूर्णा अभयारण्याच्या वतीने करण्यात आले.           यानिमित्ताने सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी अभयारण्यातील निसर्ग पाऊलवाटांवर भ्रमंती केली.भ्रमंतीदरम्यान काटेपूर्णा अभयारण्यातील विविध प्राणी,पक्षी व झाडे यांची ओळख गाईड यांनी करून दिली.         सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना स्लाईड शोच्या माध्यमातून काटेपूर्णा अभयारण्याबाबत माहिती तसेच व्याघ्र दिवसाचे महत्व काटेपूर्णा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी पटवून दिले. त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या जीवनावर आधारित " टायगर सिस्टर ऑफ तेलिया " ही ध्वनीचित्रफित दाखवि

18 जुलैपासून 45 दिवसाच्या आत हरकती व सूचना मागविल्या

Image
18 जुलैपासून 45 दिवसाच्या आत हरकती व सूचना मागविल्या कामगार आयुक्तांचे आवाहन      वाशिम, दि. 29 (जिमाका) :  महाराष्ट्र व्यावसायीक सुरक्षा, आरोग्य व सेवाशर्ती संहिता (कामगार) मसुदा नियम 2021 चा मसुदा शासनाच्या राजपत्रामध्ये 18 जुलै रोजीच्या अधिसुचनेव्दारे प्रसिध्द करण्यात आला आहे. हा मसुदा नियम कामगार विभागाच्या  https://mahakamgar. maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर केंद्रीय कायदे व नियम या शिर्षाखाली प्रसिध्द करण्यात आला आहे. या अधिसूचनेव्दारे प्रसिध्द केलेल्या मसुद्याबाबत 45 दिवसाच्या आत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.          या प्रारुप/मसुद्याबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना असल्यास कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी-20, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई 400051 या कार्यालयात किंवा कामगार आयुक्तालयाच्या  mahalabourcommr@gmail.com  या ई-मेलवर स्विकारण्यात येतील. असे सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी कळविले आहे.                                                                                                                  

मतदार ओळखपत्राला आधार लिंकसाठी १ ऑगस्टपासून विशेष मोहिम

Image
मतदार ओळखपत्राला आधार लिंकसाठी १ ऑगस्टपासून  विशेष मोहिम ·         मतदार ओळखपत्राचे आधार क्रमांकाशी जोडणी करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन      वाशिम, दि. 29 (जिमाका) :  भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांच्यावतीने निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२१ अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. यामध्ये कलम २३ नुसार मतदार याद्यातील तपशिलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छीकपणे आधारची माहिती संग्रहीत करण्याबाबतच्या सुधारणा अंतर्भूत आहेत. त्याआधारे मतदार नोंदणी नियम, १९६० मधील नियम 26 बी मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणाची अंमलबजावणी ०१ ऑगस्ट २०२२ पासून लागू होणार आहे. कायदा आणि नियमामध्ये केलेल्या सुधारणानंतर मतदार नोंदणी अधिकारी हे मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तींकडून विहीत स्वरुपात आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. अधिसूचना १७ जुन २०२२ मध्ये निर्दीष्ट केल्यानुसार ०१ एप्रिल २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी मतदार यादीत आलेली व्यक्ती यांचा आधार क्रमांक उपल

देशाच्या प्रगतीत ऊर्जा क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे - आमदार अमित झनक

Image
देशाच्या प्रगतीत ऊर्जा क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे                                                                          - आमदार अमित झनक जोगदलरी येथे  “  उज्वल भारत, उज्वल भविष्य  ”  महोत्सव      वाशिम, दि. 27 (जिमाका) :  देश स्वातंत्र्य झाला तेंव्हाची आणि आताच्या परिस्थितीमध्ये मोठा फरक आहे. वीज बचतीसोबत वीज निर्मितीत आपला देश आज आत्मनिर्भर होत आहे. यावरुन देशाच्या प्रगतीत ऊर्जा क्षेत्राचे योगदान सुध्दा महत्वाचे आहे हे लक्षात येते. असे प्रतिपादन आमदार अमित झनक यांनी केले.         भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  “ उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य ” या महोत्सवाचे आयोजन मालेगाव तालुक्यातील जोगलदरी येथील काळामाथा मंदीर येथे आज 27 जुलै रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन आमदार श्री. झनक बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, पंचायत समिती सदस्य रंजित घुगे, महावितरण अकोलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, महावितरण अकोला येथील पायाभूत सुविधाचे अधिक्षक अभियंता अनिल वाकोडे, केंद्र सरकारच्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच

वीजेच्या बाबतीत जिल्हयाचे मागासलेपण दूर होण्यास मदत चंद्रकांत ठाकरे

Image
  वीजेच्या बाबतीत जिल्हयाचे मागासलेपण दूर होण्यास मदत                                                       चंद्रकांत ठाकरे “ उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य ” अंतर्गत उर्जा महोत्सव ·        योजनेचे लाभार्थी सन्मानीत ·        8 वर्षातील उर्जा कामगिरीवर ध्वनीचित्रफितीतून उजाळा ·        विद्यार्थ्यांच्या पथनाटयातून प्रबोधनाचा संदेश       वाशिम, दि. 26 (जिमाका) : केंद्र आणि राज्य सरकारने उर्जा विभागाच्या माध्यमातून 8 वर्षात केलेल्या प्रगतीची माहिती “ उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य ” या महोत्सवातून मांडण्यात येत आहे. कोळसा साठा भविष्यात संपणार असल्याने औष्णिक वीज निर्मितीला मर्यादा येणार आहे. अपारंपारीक उर्जेतून देश सन 2047 पर्यंत समृध्द होईल. सौर, पवन आणि जल उर्जेतून आपण वीजेच्या बाबतीत संपन्न होणार आहोत. या पारंपारीक उर्जेतूनच आपल्या आकांक्षित जिल्हयाचे मागासलेपण दूर होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.         आज 26 जुलै रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात “ उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य ” च्या निमित्ताने आयोजित उर्जा महोत्सव - पॉवर

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ

Image
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या चित्ररथाचा शुभारंभ  वाशिम दि.२६(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी आज २६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या चित्ररथाचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे, तांत्रिक कृषी अधिकारी एस.एस.मकासरे व कृषी विमा कंपनी ऑफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक सोमेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती       आजपासून 30 जुलैपर्यंत तीन चित्ररथ जिल्ह्यातील काही गावात जाऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करणार आहे. या चित्ररथावर पीक विमा योजनेची माहिती लावण्यात आली आहे. ऑडिओ जिंगल्स,योजनेचे पॉम्लेट्स आणि भित्तीपत्रकाच्या माध्यमातून माहिती गावपातळीवर शेतक-यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.चित्ररथामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी 31 जुलैपर्यंत पिक विमा काढण्यास प्रोत्साहित होतील.

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात घरोघरी तिरंगा· सर्वांनी राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे

Image
13 ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात घरोघरी तिरंगा ·        सर्वांनी राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे ·         घरावरील ध्वज उतरविण्याची आवश्यकता नाही ·         कार्यालयांना ध्वज संहिता       वाशिम, दि. 25 (जिमाका) :  आपला देश स्वातंत्र्य होवून 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरीकांच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहण्यासोबतच स्वातंत्र्य लढयातील अज्ञात नायक/क्रांतीकारक तसेच त्या दरम्यान घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी जनमाणसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सावाअंतर्गत जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व नागरीकांनी राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे. वरील कालावधीत नागरीकांना घरावरील राष्ट्रध्वज उतरविण्याची आवश्यकता नाही. कार्यालयांना मात्र ध्वज संहिता पाळावी लागणार आहे.          या उपक्रमाअंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रत्येक नागरीकांच्या घरावर

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी 7 लक्ष 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज योजना

Image
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी 7 लक्ष 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज योजना       वाशिम, दि. 25 (जिमाका) :  मुस्लिम, बौद्ध, शीख, पारसी, ख्रिश्चन, जैन व ज्यू या अल्पसंख्यांक              समुदयातील गरजू विध्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या इंजीनियरिंग, मेडिकल, पॉलटेक्नीक अभियांत्रिकी, नर्सिंग, फॅशन डिझायनिंग, टुरिझम, पत्रकारिता, हॉटेल मॅनेजमेंट, मास मिडिया, अॅनिमेशन व चित्रपट निर्मिती या संबंधी  विविध व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत ७ लाख ५० हजार रुपयापर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ऑनलाइन अर्जाकरिता https://www.malms.maharashtra. gov.in  या संकेतस्थळाचा वापर करावा.          संपर्कासाठी व अर्ज सादर करण्यासाठी मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ नवीन आयु.डी.पी.कॉलनी, आय.टी.आय.कॉलेज समोर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या योजनेचा जास्तीत जास्त अल्पसंखायांक विद्यार्थ्यांनी ल

जिल्हा न्यायालयात कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

Image
जिल्हा न्यायालयात कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न       वाशिम, दि. 25 (जिमाका) :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम व जिल्हा विधीज्ञ संघ, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम यांच्या मार्गदर्शनात नुकतेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. डी. आर. कलवार उपस्थित होते.         श्री. व्ही. ए. टेकवाणी यांनी उपस्थितांना त्यांचे अधिकाराबद्दल, पोलीसांचे अधिकार व दायीत्व, कायद्याअंतर्गत काय प्रतिबंधीत आहे आणि कशाला परवानगी आहे, न्यायालयामार्फत त्यांच्या अधिकारांची बजावणी कशाप्रकारे करता येईल आणि पोलीसांकडून किंवा तस्करांपासून होणाऱ्या छळाला कशाप्रकारे प्रतिबंध करता येईल याबद्दल कायदेविषयक मार्गदर्शन केले.         अॅड. श्रीमती पी. एल. वैरागडे यांनी मानव तस्करी आणि व्यावसायीक लैंगीक शोषणाचे बळी नालसा योजना ०१५ याबाबत मार्गदर्शन केले. श्रीमती श

28 जुलैपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Image
28 जुलैपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन       वाशिम, दि. 25 (जिमाका) :  जिल्हयातील नोकरी/रोजगार इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात. या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाच्या वतीने २८ जुलैपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये टेक्नोक्राप्ट फॅशन लिमीटेड अमरावती, मटॅलेंट सेतु प्रा. लि. पुणे, वर्क फोर्स प्रा.लि.पूणे व रवि पाटील ट्रॅक्टर्स, वाशिम इत्यादी नामांकित कंपनी उद्योगाकडील उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी मुलाखतीद्वारे नोकरी इच्छुक उमेदवारांना खाजगी नोकरी/रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे.          यासाठी इयत्ता १० वी, १२ वी, आय.टी.आय. पदवीधर (इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड), (कला/वाणिज्य/विज्ञान) व इंजिनिअरींग डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रता असणे असणारे व वय १८ ते ४५ वर्षापर्यंतच्या युवक-युवती उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या पदनामांकरीता १६० पेक्षा जास्त रिक्तपदावर रोजगार मिळवण्याची संधी जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना याव्दारे प्राप्त होणार आहे.

25 जुलै रोजी मालेगांव येथे रोजगार मेळावा

Image
25 जुलै रोजी मालेगांव येथे रोजगार मेळावा       वाशिम, दि. 22 (जिमाका) :  नोकरी/रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाच्या वतीने शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालेगांव येथे २५ जुलै रोजी सकाळी १० ते ते दुपारी ४ वाजेपर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.           या मेळाव्यात वाळूज एमआयडीसी, औरंगाबाद येथील संजिव ऑटो, पिट्टी इंजिनिअरींग, एस. एस. सी. कंट्रोल, एन्डूरंस, सिडलर ईलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. या नामांकित कंपन्यांकडून त्यांचे उद्योजक किंवा प्रतिनिधी मेळाव्यात उपस्थित राहून जिल्हयातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देवून तात्काळ प्रभावाने खाजगी नोकरीकरीता या कंपनीत रुजू करुन घेण्यात येणार आहे.          प्राध्यान्याने आयटीआयचे (सर्व ट्रेडस्) आणि इयत्ता १० वी, १२ वी, पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान), अभियांत्रिकी पदवीधर, इंजिनिअरींग डिप्लोमा (सर्व शाखा) इत्यादी शैक्षणीक पात्रता असणारे उमेदवार त्यांची वयोमर्यादा १८

मागासवर्ग विकास महामंडळाच्या पाच कर्ज योजनांचा लाभ घ्यावा

Image
मागासवर्ग विकास महामंडळाच्या पाच कर्ज योजना योजनांचा लाभ घ्यावा       वाशिम, दि. 22 (जिमाका) :  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने इतर मागास वर्गातील (ओबीसी) लाभार्थ्यांसाठी पाच कर्ज योजना सुरु करण्यात आल्या आहे.  20 टक्के बीज भांडवल योजना-  या योजनेची कर्ज मर्यादा 5 लक्ष रुपये आहे. यामध्ये बँकेचा सहभाग 75 टक्के, महामंडळाचा सहभाग 20 टक्के आणि लाभार्थ्यांचा सहभाग 5 टक्के असा आहे. कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षाचा आहे. प्रकल्प रक्कम 2 लक्ष 50 हजार रुपयापर्यंत आहे. जिल्हयातील 23 लाभार्थ्यांना 9 लक्ष 20 हजार रुपये कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. 2 लक्ष 50 हजार रुपयांपेक्षा जास्त कर्ज 23 लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार असून त्यांना 18 लक्ष 45 हजार रुपये कर्ज वाटप करण्यात येणार आहे.  थेट कर्ज योजना-  या योजनेअंतर्गत 1 लक्ष रुपये कर्ज वाटप 120 लाभार्थ्यांना प्रति 1 लक्ष रुपये याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी चार वर्ष आहे.  वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (ऑनलाईन)-  या योजनेअंतर्गत कर्

उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य "२६ व २७ जुलै रोजी वाशिम व जोगलदरी येथे कार्यक्रम

Image
" उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य " २६ व २७ जुलै रोजी वाशिम व जोगलदरी येथे कार्यक्रम      वाशिम, दि. 22 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि महावितरण वाशिमच्या वतीने  जिल्ह्यात " उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य  " अंतर्गत वाशिम आणि जोगलदरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती वाशिम महावितरणचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य यांनी दिली.         जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता " उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य " या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला खासदार भावना गवळी,संजय धोत्रे, आमदार रणजीत पाटील,किरण सरनाईक,वसंत खंडेलवाल,लखन मलीक, राजेंद्र पाटणी,अमित झनक, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, किन्हीराजा जोगलदरीच्या सरपंच सुनिता राठोड, जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित रा

जिल्हाधिकार्‍यांनी केली पिकांची व इमारत बांधकामांची पाहणी

Image
जिल्हाधिकार्‍यांनी केली पिकांची व इमारत बांधकामांची पाहणी  वाशिम दि.२१(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी आज २२ जुलै रोजी मंगरूळपीर  येथे  जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बांधण्यात येत असलेल्या पशु चिकित्सालय व तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.तातडीने इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. तहसील कार्यालय परिसरात बांधण्यात येत असलेल्या सभागृहाच्या बांधकामाची देखील पाहणी केली. बांधकामास विलंब झाला असून हे काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.            तालुक्यातील मोहरी शिवारात काही शेतकऱ्यांनी बीबीएफ पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची श्री.षण्मुगराजन यांनी पाहणी केली.शेतात आता पाणी साचत नसल्याने व पीक चांगले बहरले असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. मंगरुळपीर तालुक्यात या खरीप हंगामात २५ टक्के बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पिकाची लागवड केल्याचे कृषी अधिकारी यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. शिवणीजवळून वाहणाऱ्या अडाण  नदीवर बांधण्यात आ

उच्च दुग्ध उत्पादनासाठी गाई व म्हशींची नोंदणी करा

Image
उच्च दुग्ध उत्पादनासाठी गाई व म्हशींची नोंदणी करा पशुसंवर्धन विभागाचे आवाहन        वाशिम, दि. 21 (जिमाका) :  गाई व म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेश अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम ही योजना राज्यात सन 2013-14 पासून रबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी उच्च दुग्ध उत्पादन क्षमतेच्या गाई व म्हशींची नोंदणी करण्यात येते. तालुका व जिल्हास्तरावर दुग्ध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या गाई व म्हशींना उच्च वंशावळीच्या वळूच्या रेतमात्रांनी कृत्रिम रेतन करण्यात येते व जन्मलेल्या वासरांची निगा राखण्याकरीता मापदंडानुसार प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत पशुपालकांकडे असलेल्या उच्च दुग्ध उत्पादन क्षमतेच्या गाई व म्हशींची नोंदणी करण्याकरीता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, वाशिम यांनी केले आहे.                                                                                                                                          *******

रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रिक्तपदे भरण्यासाठी मागणीपत्र सादर करा

Image
रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रिक्तपदे भरण्यासाठी मागणीपत्र सादर करा 22 जुलै अंतिम तारीख        वाशिम, दि. 21 (जिमाका) :  कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यात अद्यापही रोजगाराचा प्रश्न गंभीरच आहे. अशातच जिल्हयातील काही युवक-युवतींचे विविध ठिकाणच्या उद्योग/आस्थापनांवरील रोजगार गेले आहे. त्यांना आणि इतर रोजगार इच्छुक युवक/युवतींना पुन्हा रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळावा २२ ते २४ जुलै २०२२ या दरम्यान  www.rojgar.mahaswayam.gov.in  या  वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आला आहे.          ऑफलाईन रोजगार मेळावा २५ जुलै रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी एरिया, मालेगांव येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम कार्यालयाकडुन जिल्हयातील नोकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील खाजगी क्षेत्रातील नियोक्ते/आस्थापना प्रमुखांनी आपल्या आस्थापनांवर आवश्यक असणारे मनुष्यबळ पुर्तीकरीता मागणी पत्र सादर करावे. सदर मागणी

फळबाग व फुलशेती लागवडीसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करावे

Image
फळबाग व फुलशेती लागवडीसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करावे        वाशिम, दि. 21 (जिमाका) :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग व फुलशेती लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. फळबाग योजनेअंतर्गत लाभार्थी दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेऊ शकतात. या योजनेकरीता तीन वर्षात शंभर टक्के अनुदान देण्यात येते. लाभार्थ्यांची निवड कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता अर्ज करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.          फळबाग लागवडीचा कालावधी 1 जून ते 31 डिसेंबरपर्यंत योग्य असतो. सिंचनाची व्यवस्था असल्यास वर्षभरात केंव्हाही लागवड करता येते. यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉब कर्डधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्‍त जाती भटक्या जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जमाती) दारिद्रय रेषेखालील इतर कुटूंब, स्त्री प्रमुख असलेली कुटूंब, दिव्यांग व्यक्ती प्रमुख असलेली कुटूंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व

दोन वर्षानंतर येणारा गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात आणि शांततेत साजरा करा

Image
दोन वर्षानंतर येणारा गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात आणि शांततेत साजरा करा गणेशोत्सव मंडळाना सर्वं परवानग्या एक खिडकीद्वारे देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश गणेशोत्सव मंडळाना नोंदणी शुल्क, हमी पत्राची अट शिथिल मुंबई दि. 21-गणेशोत्सव, दहीहंडी  आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावा यासाठी सर्वं यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  दिले. गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यानी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्शवभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात तसेच विविध व्यवस्थेबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली. मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले गेली दोन वर्षे आपण

शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले

Image
शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले        वाशिम, दि. 21 (जिमाका) :  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात ऑन फॉर्म ट्रेनिंग राबविण्यात येत आहे. फलोत्पादन तसेच कृषी क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व सांगली याठिकाणी कार्यरत आहे. फलोत्पादन आणि प्रक्रीया क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे व प्रशिक्षणाचे नियोजन उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम कार्यालयाने केले आहे. या पाच दिवशीय प्रशिक्षण दौऱ्यासाठी शासनामार्फत अनुदानावर सहलीसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत राबविलेल्या उपक्रमांची पाहणी करुन शेती क्षेत्रात उत्पन्न वाढीसाठीच्या संधीचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे. फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षित शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन व प्राथमिक प्रक्रीया याबाबत लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेऊ इच्छित असल

केंद्रीय विद्यालय येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

Image
केंद्रीय विद्यालय येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न        वाशिम, दि. 20 (जिमाका) :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ, वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने १८ जुलै रोजी केंद्रीय विद्यालय, वाशिम येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, जिल्हा विधीज्ञ संघाचे सहसचिव ॲड. ए.पी. वानरे, प्रमुख वक्ते म्हणून ॲड. डी.पी. अदमने, केंद्रीय विद्यालयाचे प्रभाग मुख्याध्यापक जी. ए. मनवर व महिला व बाल विकास कार्यालयाचे परिविक्षा अधिकारी जे. एम. चौधरी यांची उपस्थिती होती.          यावेळी श्री. टेकवाणी यांनी विद्यालयातील कोविड आजारामुळे ज्या मुला-मुलींचे आई- वडील यांचे मृत्यू झाले अशा दोन विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रमुख वक्ते अॅड. डी. पी. अदमने यांनी बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. जे. एम. चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालकांचे अधिकार, बाल विवाह, बेटी बचाव बेटी पढाओ तसेच बालकांच्या शिक्षणाविषयीच्या अधिकाराबद्दल माहिती दिली.    

सखल भागातील आणि नदी-नाले व ओढयाच्या काठावरील नागरीकांनी सतर्क राहावे

Image
सखल भागातील आणि नदी-नाले व ओढयाच्या काठावरील नागरीकांनी सतर्क राहावे        वाशिम, दि. 20 (जिमाका) :  वाशिम तालुक्यात सखल भागात राहणाऱ्या नागरीकांनी संततधार पावसामुळे  पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचे लक्षात येताच तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे. नदी नाले व ओढयाकाठच्या नागरीकांनी देखील सतर्क राहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरीकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर राहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा नाल्यावरील पुलांवरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीचा आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भुस्खलन होण्याची व दरड कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरीकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदीच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू व उतरु नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असतांना झाडाच्या खाली न थांबता सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. प्रत्येक ना

13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालत

Image
13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालत        वाशिम, दि. 19 (जिमाका) :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ मंडळ, वाशिम यांच्या संयुक्तवतीने जिल्हा न्यायालय येथे आणि तालुका विधी सेवा समिती व तालुका विधीज्ञ मंडळ यांच्या संयुक्तवतीने तालुका न्यायालय येथे 13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात येणार आहे. तरी न्यायालयात दाखल असलेली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्याकरीता संबंधितांनी आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा तसेच दाखलपूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा.          या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी (तडजोडपात्र गुन्हे), भूसंपादन नुकसान भरपाईची प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे कर्ज व वसूली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद, मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, पराक्राम्य विलेख अधिनियम (निगोशिएबल इन्ट्रुमेंट्स ॲक्ट) च्या क-138 खाली दा

केलेल्या कामांची माहिती पोर्टलवर अपलोड करावी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

Image
केलेल्या कामांची माहिती पोर्टलवर अपलोड करावी                                         जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. ‘कॅच द रेन’ मोहिमेचा आढावा       आजपर्यंत 2 लक्ष 50 हजार कामे पूर्ण  वाशिम, दि.18 (जिमाका) जिल्हयात ‘ कॅच द रेन ’ या मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवड,विहीर पुनर्भरण,बोअर दूरुस्ती,शोषखड्डे,छतावर पडणाऱ्या पावसाचे संकलन,अस्तीत्वात असलेल्या स्ट्रक्चरच्या दुरुस्तीसह विविध प्रकारची कामे यंत्रणांकडून करण्यात येत आहे.या कामामुळे भूगर्भात पाण्याच्या साठवणूकीसह विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या कामाला मदत होत आहे.यंत्रणांनी या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची माहिती काम पूर्ण होताच संबंधित पोर्टलवर अपलोड करावी. अशी सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी केली.               आज 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलशक्ती अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘ कॅच द रेन ’ मोहिमेचा आढावा श्री. षण्मुगराजन यांनी घेतला यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,उपवनसंरक्षक श्री. मीणा,जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, मह

13 ते 15 ऑगस्ट दरम्यानच्या‘ हर घर तिरंगा ’ उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे

Image
13 ते 15 ऑगस्ट दरम्यानच्या ‘ हर घर तिरंगा ’ उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे                                                                जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.        वाशिम, दि.18 (जिमाका)  देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृती नागरीकांच्या मनात तेवत राहाव्यात तसेच स्वातंत्र्य लढयातील अज्ञात नायक/ क्रांतीकारक व घडलेल्या विविध घटनांचे स्मरण होवून देशभक्तीची भावना जनमाणसात कायमस्वरुपी राहावी याच उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘ हर घर तिरंगा ’ हा उपक्रम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घरावर,शासकीय व निमशासकीय तसेच विविध खाजगी आस्थापनांवर तिरंगा ध्वज लावण्याच्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी केले.         आज 18 जुलै रोजी ‘ हर घर तिरंगा ’ उपक्रम राबविण्याबाबत आयोजित सभेत श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,उपवनसंरक्षक श्री. मिणा, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अ

जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा

Image
जागतिक युवा कौशल्य दिन  उत्साहात साजरा वाशिम दि.16(जिमाका)जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,वाशिम आणि स्टेट बँक ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वाशिम यांचे संयुक्त वतीने  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने जागतिक युवा कौशल्य दिन 15 जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आर -सेटी या प्रशिक्षण संस्थेतील फोटाग्राफी ॲण्ड व्हिडीओग्राफी या अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त, श्रीमती सुनंदा बजाज यांनी  मार्गदर्शन केले.यावेळी अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर व दिनेश बारापात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.              कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम,सुशिलाताई जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम आणि स्वामी विवेकानंद व्होकेशनल इंस्टिटयूट,रिसोड यांनी सहकार्य केले.             राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, वाशिम येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन वेबिनारद्वारे जिल्हा

रिसोड येथे नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत

Image
रिसोड येथे नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत       वाशिम, दि. 15 (जिमाका) : रिसोड तालुक्यात जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. परंतू जुलै महिन्यात पावसाचे स्वरुप बदलले. जुलै महिन्यातील या आठवडयात रिसोड तालुक्यात संततधार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश नद्या व नाल्यांना पूर आलेला आहे. अशा परिस्थितीत पूर, वीज पडणे, पुरामुळे गावांचा संपर्क तुटणे, तलावात बुडणे किंवा इतर नैसर्गीक आपत्तीच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्याकरीता तहसिल कार्यालय, रिसोड येथे नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.          रिसोड तालुक्यातील नागरीकांनी तालुक्यात नैसर्गीक आपत्तीच्या अनुषंगाने कोणतीही घटना घडल्यास किंवा घडण्याची शक्यता असल्यास, नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी वेळीच सहकार्य करुन मदत पोहचविण्यासाठी नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी 07251-222316 व भ्रमणध्वनी क्रमांक 7769969759 यावर संपर्क साधावा. असे आवाहन रिसोडचे तहसिलदार तथा तालुका व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अजित शेलार यांनी केले आहे.