मागासवर्ग विकास महामंडळाच्या पाच कर्ज योजनांचा लाभ घ्यावा
- Get link
- X
- Other Apps
मागासवर्ग विकास महामंडळाच्या
पाच कर्ज योजना
योजनांचा लाभ घ्यावा
वाशिम, दि. 22 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने इतर मागास वर्गातील (ओबीसी) लाभार्थ्यांसाठी पाच कर्ज योजना सुरु करण्यात आल्या आहे. 20 टक्के बीज भांडवल योजना- या योजनेची कर्ज मर्यादा 5 लक्ष रुपये आहे. यामध्ये बँकेचा सहभाग 75 टक्के, महामंडळाचा सहभाग 20 टक्के आणि लाभार्थ्यांचा सहभाग 5 टक्के असा आहे. कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षाचा आहे. प्रकल्प रक्कम 2 लक्ष 50 हजार रुपयापर्यंत आहे. जिल्हयातील 23 लाभार्थ्यांना 9 लक्ष 20 हजार रुपये कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. 2 लक्ष 50 हजार रुपयांपेक्षा जास्त कर्ज 23 लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार असून त्यांना 18 लक्ष 45 हजार रुपये कर्ज वाटप करण्यात येणार आहे. थेट कर्ज योजना- या योजनेअंतर्गत 1 लक्ष रुपये कर्ज वाटप 120 लाभार्थ्यांना प्रति 1 लक्ष रुपये याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी चार वर्ष आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (ऑनलाईन)- या योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 10 लक्ष रुपये आहे. जिल्हयातील 119 लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 35 लक्ष 66 हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. गट कर्ज व्याज परतावा योजना (ऑनलाईन)- ही योजना ऑनलाईन स्वरुपाची आहे. कर्ज मर्यादा 50 लक्ष रुपये आहे. जिल्हयातील 13 लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत 70 लक्ष 85 हजार रुपये वाटप करण्यात येणार आहे. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (ऑनलाईन)- या योजनेची कर्ज मर्यादा 20 लक्ष रुपये आहे. 11 लाभार्थ्यांना 16 लक्ष 50 हजार रुपये या योजनेअंतर्गत वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
वरील पाचही योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वय 18 ते 50 वर्षादरम्यान असावे. लाभार्थ्यांनी उत्पन्नाच्या दाखल्यासोबत सक्षम अधिकाऱ्याने प्रगत गटात मोडत नसल्याबाबतच्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती, जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, सातबाराचा उतारा, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, दोन जामीनदार यांचे हमीपत्र किंवा गहाणखत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे कर्जदारास प्रतिज्ञापत्र, तांत्रिक व्यवसायकरीता आवश्यक असतील असे परवाने, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व त्यासाठी लागणारा कच्चामाल, यंत्रसामूग्री आदीचे दरपत्रक महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी निर्देशित केल्याप्रमाणे इतर कागदपत्रांचा तपशिल पात्र व्यक्तींनी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट दयावी. अधिक महितीसाठी कार्यालयाच्या 07252-231665 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त्ा आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment