25 ते 31 जुलै दरम्यान उज्वल भारत/उज्वल भविष्य महोत्सव

25 ते 31 जुलै दरम्यान
उज्वल भारत/उज्वल भविष्य महोत्सव 

वाशिम दि.12 (जिमाका) ऊर्जा,नवी व नविकरणीय मंत्रालय,भारत सरकार आणि इतर भागीदार यांच्यामार्फत 25 ते 31 जुलै दरम्यान उज्वल भारत/उज्वल भविष्य महोत्सव जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी ऊर्जा विभागामध्ये मागील 8 वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामाचा समावेश करण्यात येणार आहे.हा महोत्सव देशातील 773 जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. अंतिम कार्यक्रम देशातील 100 ठिकाणी संक्रमित पद्धतीने नियमित आठवडाभर साजरा करण्यात येणार आहे.त्यातील 5 लाभार्थ्याची निवड केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे. जिल्ह्यात 2 लाभार्थी ठिकाणे निश्चित करून हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.यासाठी  सध्या उर्जाप्रेरीत झालेली गावे/स्वातंत्र्य सैनिक किंवा ऐतिहासिक अशा ठिकाणाची निवड करण्यात येणार आहे.जिल्हा नोडल अधिकारी म्हणून अधिक्षक अभियंता, महावितरण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे