जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा २०२२ चे आयोजन
- Get link
- X
- Other Apps
जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी
फुटबॉल कप क्रीडा स्पर्धा २०२२ चे आयोजन
वाशिम, दि. 01 (जिमाका) : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सुब्रोतो मुखजी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटी,नवी दिल्ली द्वारा सन २०२२-२३ या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप (सबज्युनियर/ज्युनियर) क्रीडा स्पर्धा कार्यक्रम संचालनालयास प्राप्त आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयअंतर्गत जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप (सबज्युनियर/ज्युनियर) क्रीडा स्पर्धा १४ वर्षाखालील मुले, (सबज्युनियर) साठी १३ ते १४ जुलै तसेच १७ वर्षाखालील मुले व मुली (ज्युनियर) साठी १४ व १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप (सबज्युनियर/ज्युनियर) क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्मतारखेनुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे. १४ वर्षाखालील मुले, (सबज्युनियर)- ०१ जानेवारी २००९ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. १७ वर्षाखालील मुले व मुली, (ज्युनियर)- ०१ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप (सबज्युनियर/ज्युनियर) क्रीडा स्पर्धेत सर्व संघानी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागीपूर्वीच www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू तसेच संघाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संचानी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन नोंदणी १० जुलै २०२२ पर्यंत करणे आवश्यक आहे.स्पर्धेत सहभागी खेळाडूंकडे जन्मतारखेचा दाखला, आधारकार्ड व पासपोर्ड (सर्व मुळ प्रतीत) असणे अनिवार्य आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यामध्ये एखादा खेळाडू अधिक वयाचा आढळल्यास संपूर्ण संघ बाद करण्यात येणार आहे.अधिक माहिती करीता राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी कार्यालयी
न वेळेत संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता यांनी केले आहे.*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment