जिल्हा रुग्णालयात व जिल्हा न्यायालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा
जिल्हा रुग्णालयात व जिल्हा न्यायालयात
जागतिक लोकसंख्या दिन साजरा
वाशिम, दि. 14 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम व जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने ११ जुलै रोजी जिल्हा रुग्णालय येथे जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. काळबांडे व डॉ. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. काळबांडे, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉ. मोरे, अॅड. राधा नरवलीया, अॅड. सावरकर यांनी जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दिनाचे औचित्य साधून मोतीराम खडसे यांनी वाशिम येथील रेल्वे स्टेशन, बस स्थानक व इतर ठिकाणी हस्तपत्रकांचे वाटप केले.
जिल्हा न्यायालय येथील जिल्हा विधीज्ञ संघाच्या कक्षामध्ये देखील जागतिक लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. श्री. कलवार, अॅड. खराटे, जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव व जिल्हा विधीज्ञ संघाचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी व पक्षकार यांची यावेळी मोठया संख्येने उपस्थिती होती. सुत्रसंचालन व आभार राहुल कसादे यांनी मानले.
*******
Comments
Post a Comment