गेल्या 24 तासात 57 मि.मी. पावसाची नोंद वाशिम व मालेगाव तालुक्यात अतिवृष्टी
गेल्या 24 तासात
57 मि.मी. पावसाची नोंद
वाशिम व मालेगाव तालुक्यात अतिवृष्टी
वाशिम, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यात 14 जुलै 2022 रोजी सकाळी 9.30 वाजतापर्यंत गेल्या 24 तासात सरासरी 57 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 1 जून 2022 पासून जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 352.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
आज 14 जुलै रोजी सकाळी गेल्या 24 तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंसात दिलेली पाऊसाची आकडेवारी ही यावर्षीच्या 1 जून 2022 पासूनची आहे. वाशिम तालुका- 72.3 मिमी, (349.5) रिसोड तालुका- 61.1 मिमी (395.4), मालेगाव तालुका- 71.4 मिमी (372.7), मंगरूळपीर तालुका- 52.8 मिमी (370.5), मानोरा तालुका- 48.3 मिमी (400.1) आणि कारंजा तालुका- 31.7 (240.1) मिलीमीटर पाऊस झाला. मागील वर्षी 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात 339.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. गेल्या 24 तासात वाशिम तालुक्यात 72.3 मि.मी. आणि मालेगांव तालुक्यात 71.4 मि.मी. पाऊस पडल्याने या तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
*******
Comments
Post a Comment