जिल्हयात 95 टक्के पेरण्या पुर्ण 3 लाख 87 हजार 680 हेक्टरवर पेरणी· सर्वाधिक 2 लाख 99 हजार 384 हेक्टरवर सोयाबीन पेरणी
- Get link
- X
- Other Apps
जिल्हयात 95 टक्के पेरण्या पुर्ण
3 लाख 87 हजार 680 हेक्टरवर पेरणी
· सर्वाधिक 2 लाख 99 हजार 384 हेक्टरवर सोयाबीन पेरणी
वाशिम, दि. 15 (जिमाका) : जिल्हयात यंदाच्या खरीप हंगामात 95 टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहे. जिल्हयाचे लागवड योग्य क्षेत्र 4 लाख 6 हजार 254 हेक्टर इतके आहे. 14 जुलैपर्यंत 3 लाख 87 हजार 680 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहे. सोयाबीन हब म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हयात सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या खरीप हंगामात 2 लाख 99 हजार 384 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची सर्वाधिक पेरणी करण्यात आली आहे. तुरीची लागवड 60 हजार 103 हेक्टरवर, कापुस लागवड 21 हजार 738 हेक्टर, उडीद लागवड 3 हजार 42 हेक्टर, मुग 2 हजार 497 हेक्टर, ज्वारी 229 हेक्टर, मका 108 हेक्टर आणि उसाची 153 हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.
ज्वारी, बाजरी, मका व इतर तृण धान्यासह 450 हेक्टर तृणधान्य पिके, तूर, मुग, उडीद व इतर कडधान्य असे एकूण 65 हजार 812 हेक्टरवर कडधान्य पिके, सोयाबीन इतर गळीतधान्यासह 2 लाख 99 हजार 527 हेक्टरवर गळीत धान्य पिके आणि कापूस व उस पिकाची 21 हजार 891 हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.
5 टक्के पेरण्या हया मागील पाच दिवसापासून पाऊस सुरु असल्यामुळे खोळंबल्या आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment