उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान
- Get link
- X
- Other Apps
उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या
डॉक्टरांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान
वाशिम, दि. 01 (जिमाका) : केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आज 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. उमेश मडावी व बालरोग तज्ञ डॉ. विजय कानडे यांना प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, भारतीय वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिपक शेळके, समन्वयक डॉ.रंजित सरनाईक, डॉ. अभय निर्बाण, डॉ राजेंद्र ठाकूर व आरोग्य मित्र वैभव चव्हाण उपस्थित होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment