शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले
- Get link
- X
- Other Apps
शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी
1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले
वाशिम, दि. 21 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात ऑन फॉर्म ट्रेनिंग राबविण्यात येत आहे. फलोत्पादन तसेच कृषी क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्या संशोधन संस्था, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व सांगली याठिकाणी कार्यरत आहे. फलोत्पादन आणि प्रक्रीया क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याचे व प्रशिक्षणाचे नियोजन उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम कार्यालयाने केले आहे. या पाच दिवशीय प्रशिक्षण दौऱ्यासाठी शासनामार्फत अनुदानावर सहलीसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून 1 ऑगस्टपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत राबविलेल्या उपक्रमांची पाहणी करुन शेती क्षेत्रात उत्पन्न वाढीसाठीच्या संधीचा अभ्यास शेतकऱ्यांना करता येणार आहे. फळबाग लागवड, कांदाचाळ, संरक्षित शेती, काढणी पश्चात व्यवस्थापन व प्राथमिक प्रक्रीया याबाबत लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेऊ इच्छित असलेल्या शेतकऱ्यांनी अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करावे. असे आवाहन वाशिमचे उपविभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे यांनी केले आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment