शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र मुख्याध्यापकांकडून प्राप्त करुन घ्यावे
- Get link
- X
- Other Apps
शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र
मुख्याध्यापकांकडून प्राप्त करुन घ्यावे
वाशिम, दि. ०6 (जिमाका) : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी ही 20 जुलै 2022 रोजी सर्व जिल्हयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र 1 जुलै 2022 रोजी संबंधित शाळेच्या लॉगींगमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावी. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेश अर्ज प्राप्त करुन घ्यावे. असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, वाशिम यांनी केले आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment