हर घर तिरंगाबाबत सभा संपन्न
- Get link
- X
- Other Apps
हर घर तिरंगाबाबत
सभा संपन्न
वाशिम, दि. 15 (जिमाका) : जिल्हयात 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 दरम्यान राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या उपक्रमाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सैय्यद, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, वाशिम पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोके व उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन यावेळी म्हणाले, जिल्हयातील प्रत्येक घरावर हर घर तिरंगा उपक्रमादरम्यान राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहित करावे. तसेच विविध कार्यरत खाजगी आस्थापना येथे देखील राष्ट्रध्वज लावण्यात यावे. राष्ट्रध्वज लावतांना भारतीय ध्वज संहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. तिरंगा ध्वज खरेदी करण्यासाठी तसेच कार्यालयात येणाऱ्या लोकप्रतिनिधी व अभ्यागतांना तिरंगा ध्वज भेट म्हणून देण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अभियानात सहभागी होवून निधी गोळा करण्यास सहकार्य करावे. तसेच विविध विभागाचे काम करणारे कंत्राटदार यांना सुध्दा या उपक्रमात सहभागी करुन घेवून तिरंगा ध्वज भेट म्हणून नागरीकांना देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. बचतगटांच्या माध्यमातून हर घर तिरंगा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी त्यांच्या बैठका घेण्यात याव्यात. आजी/माजी लोकप्रतिनिधींना आवाहन करुन तिरंगा ध्वज नागरीकांना भेट देण्याचे आवाहन करावे. प्रत्येक विभागाअंतर्गत येणाऱ्या कार्यालयात स्वतंत्रपणे तिरंगा ध्वज लावण्यत यावा. असे त्यांनी सांगितले.
श्री. हिंगे म्हणाले, प्रत्येक कार्यालयाच्या समोर स्टॉल लावून नागरीकांना तिरंगा ध्वज भेट म्हणून दयावा. नागरीक स्वईच्छेने खरेदी करण्यास तयार असतील तर त्यांना विकत दयावे. असे सांगितले.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment