पावसाळयात शेळया-मेंढयाची काळजी घ्यावी पशुसंवर्धन विभागाचे आवाहन



पावसाळयात शेळया-मेंढयाची काळजी घ्यावी

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

वाशिम, दि. 13 (जिमाका) : पावसाळयात पोषक वातावरणामुळे विविध रोगजंतुची वाढ झपाटयाने होत असते. यासाठी शेळया व मेंढया त्यांचा निवारा, चारा, खाद्य व पाणी यांची जैवसुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. बंदीस्त निवारा उपलब्ध नसल्यास खळयावरील धान्य किंवा कडब्याच्या गंजी झाकण्यासाठी वापरात येणारे प्लॅस्टीकच्या शीट मेंढया व शेळयावर झाकावे. वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता करावी. स्वच्छ व निर्जंतुक पाणी पशुधनास पिण्यास उपलब्ध करावे. साथ रोगांचा व संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करुन घ्यावे. जंत/कृमीनाशक औषधी पाजावी. बाहयपरजीवीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी. पशुधनाच्या खुरांना अँटीसेप्टीक सोल्युशन लावावेत. जखमा असल्यास त्यांची ड्रेसिंग करावी. पावसाळयात मृत पशुधनाची विल्हेवाट लावणे जास्त महत्वाचे आहे. मृतपशुधनाची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने करावी. जेणेकरुन रोगराई आपत्तीच्या वेळी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस त्वरीत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्हि.एन. वानखडे यांनी पशुपालकांना केले आहे.

                                                                                                                                      *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे