रिसोड येथे नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत
रिसोड येथे नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत
वाशिम, दि. 15 (जिमाका) : रिसोड तालुक्यात जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. परंतू जुलै महिन्यात पावसाचे स्वरुप बदलले. जुलै महिन्यातील या आठवडयात रिसोड तालुक्यात संततधार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश नद्या व नाल्यांना पूर आलेला आहे. अशा परिस्थितीत पूर, वीज पडणे, पुरामुळे गावांचा संपर्क तुटणे, तलावात बुडणे किंवा इतर नैसर्गीक आपत्तीच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्याकरीता तहसिल कार्यालय, रिसोड येथे नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
रिसोड तालुक्यातील नागरीकांनी तालुक्यात नैसर्गीक आपत्तीच्या अनुषंगाने कोणतीही घटना घडल्यास किंवा घडण्याची शक्यता असल्यास, नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी वेळीच सहकार्य करुन मदत पोहचविण्यासाठी नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी 07251-222316 व भ्रमणध्वनी क्रमांक 7769969759 यावर संपर्क साधावा. असे आवाहन रिसोडचे तहसिलदार तथा तालुका व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अजित शेलार यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment