जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा

जागतिक युवा कौशल्य दिन  उत्साहात साजरा

वाशिम दि.16(जिमाका)जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,वाशिम आणि स्टेट बँक ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वाशिम यांचे संयुक्त वतीने  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने जागतिक युवा कौशल्य दिन 15 जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आर -सेटी या प्रशिक्षण संस्थेतील फोटाग्राफी ॲण्ड व्हिडीओग्राफी या अभ्यासक्रमात प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त, श्रीमती सुनंदा बजाज यांनी  मार्गदर्शन केले.यावेळी अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर व दिनेश बारापात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम,सुशिलाताई जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम आणि स्वामी विवेकानंद व्होकेशनल इंस्टिटयूट,रिसोड यांनी सहकार्य केले. 
           राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, वाशिम येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन वेबिनारद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्या सहाय्यक आयुक्त, श्रीमती  बजाज यांनी मार्गदर्शन केले. 
              सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम, सुशिलाताई जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये उपस्थित विद्यार्थी व इतर उमेदवारांनी या स्पर्धेमध्ये मोठया उत्साहाने सहभाग घेतला. या दोन्ही महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या जिल्हा कार्यालयाकडून  राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत माहिती कार्यालयाचे दिपक भोळसे यांनी दिली.
           सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम येथील कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेतेतील सहभागी विद्यार्थीनीपैकी प्रथक क्रमांकाचे प्रशस्तीपत्र नेहा डोंगरदिवे   द्वितीय क्रमांकाचे प्रशस्तीपत्रक  किरण भालेराव यांना देण्यात आले.  वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे प्रशस्तीपत्रक धिरज झिंगरे याला देऊन गौरविण्यात आले.  
      या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य विनायक दुधे यांनी भुषविले. संचालन व आभार प्रा.गजानन वाघ यांनी मानले.
        सुशिलाताई जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम येथील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सानिका सरकटे, द्वितीय क्रमांक कुणाल जाधव आणि तृतीय क्रमांक संतोष रामदास जाधव यांना मिळाला.मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत जोशी हे अध्यक्षस्थानी होते,शिक्षक श्री.गणेश भरडे यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार मानले. 
      दोन्ही ठिकाणच्या जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,वाशिम कार्यालयाच्या सहायक आयुक्त श्रीमती बजाज यांच्या मार्गदर्शनात संजय राऊत, कनिष्ठ कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी तसेच संजय उगले, प्रतिक बाराहाते, अतिष घुगे व अमोल मरेवाड यांनी परिश्रम घेतले.

                 ********

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे