आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत सेवाभावी संस्थांची कार्यशाळा संपन्न



आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत

सेवाभावी संस्थांची कार्यशाळा संपन्न

      वाशिम, दि. 15 (जिमाका) : जिल्हयाचे मागासलेपण ओळखून केंद्र सरकारच्या निती आयोगाने जिल्हयाचा समावेश आकांक्षित जिल्हा म्हणून केला आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत निती आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन व पिरामल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील सेवाभावी संस्थांची कार्यशाळा आज १५ जुलै रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे संपन्न झाली.

        या कार्यशाळेत पिरामल फाउंडेशनद्वारे निती आयोगाच्या नेतृत्वाखाली आकांक्षित जिल्हा सहयोगी उपक्रम राबविण्याकरीता जिल्हयातील सेवाभावी संस्थांचा सहभाग आवश्यक आहे. त्याकरीता निती आयोगाने सेवाभावी संस्थांशी संबंधीत निर्देशांकाचा समावेश केल्याने यापुढेही अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांनी सांगीतले. यावेळी सर्व सेवाभावी संस्था ते ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रातील कामाबाबतचा अहवाल सादर करण्यात आला.

        कार्यशाळेचा उद्देश हा जिल्हयात आरोग्य, पोषण, महिला बाल कल्याण, रोजगार, जलसंधारण आणि शिक्षण आदी सुरू असलेल्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याबाबत स्थानिक सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतल्यास संबंधित विभागाच्या निर्देशांकात निश्चितच सुधारण होईल. यावेळी उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेला जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, गांधी फेलो पौसीता दत्ता व दिगंबर घोडके, पिरामल फाउंडेशनच्या प्रतिनिधी आशा गुप्ता व कौशल्या विश्वकर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश यांनी केले.

                                                                                                                                         *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे