13 ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात घरोघरी तिरंगा· सर्वांनी राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे
- Get link
- X
- Other Apps
13 ते 15 ऑगस्ट दरम्यान
जिल्ह्यात घरोघरी तिरंगा
· सर्वांनी राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे
· घरावरील ध्वज उतरविण्याची आवश्यकता नाही
· कार्यालयांना ध्वज संहिता
वाशिम, दि. 25 (जिमाका) : आपला देश स्वातंत्र्य होवून 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरीकांच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहण्यासोबतच स्वातंत्र्य लढयातील अज्ञात नायक/क्रांतीकारक तसेच त्या दरम्यान घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी जनमाणसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सावाअंतर्गत जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व नागरीकांनी राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे. वरील कालावधीत नागरीकांना घरावरील राष्ट्रध्वज उतरविण्याची आवश्यकता नाही. कार्यालयांना मात्र ध्वज संहिता पाळावी लागणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रत्येक नागरीकांच्या घरावर त्याचप्रमाणे सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थापना/ सहकारी संस्था शैक्षणिक संस्थांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फूर्तीने उभारणी करण्यात येणार आहे. राष्ट्रध्वज उभारणीसाठी लागणाऱ्या काठीची व्यवस्था स्व:तालाच करावयाची आहे. राष्ट्रध्वजाची मागणी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, स्वस्त धान्य दुकान, नगर पालीका कार्यालय, पोस्ट ऑफीस यांच्याकडे नोंदविता येईल. इतर ठिकाणावरुनही राष्ट्रध्वज खरेदी करता येईल.
तिरंगा ध्वजाचा आकार आयताकार असावा. तिरंगा ध्वजाची लांबी रुंदीचे प्रमाण 3:2 असे असावे. खादी, पॉलीस्टर, सिल्क कापड किंवा कॉटनपासून तिरंगा ध्वज बनविलेला असावा. ध्वजामधील सर्वात वर केशरी, मध्यभागी पांढरा आणि खाली हिरवा रंग असा तिरंगा ध्वज बनविला जातो. राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असलेल्या पांढऱ्या पट्टीवर 24 रेषांचे गोलाकार निळ्या रंगाचे अशोकचक्र असावे. भारतीय ध्वज संहितेचे पालन प्रत्येकाने करावे. जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये याची दक्षता नागरीकांनी घेण्याबाबत जाणीव जागृती करण्याबाबत सर्व विभागांनी विशेष काळजी घ्यावी. राष्ट्रध्वज उतरविल्यानंतर सुरक्षित आणि व्यवस्थीत ठेवावा. ध्वजावर कोणतेही अक्षर अथवा चिन्ह लावू नये. राष्ट्रध्वज जमीनीपासून उंचावर असावा. ध्वज उभारतांना तो फाटणार नाही याची काळजी घ्यावी. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment