28 जुलैपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन



28 जुलैपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

     वाशिम, दि. 25 (जिमाका) : जिल्हयातील नोकरी/रोजगार इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात. या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाच्या वतीने २८ जुलैपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये टेक्नोक्राप्ट फॅशन लिमीटेड अमरावती, मटॅलेंट सेतु प्रा. लि. पुणे, वर्क फोर्स प्रा.लि.पूणे व रवि पाटील ट्रॅक्टर्स, वाशिम इत्यादी नामांकित कंपनी उद्योगाकडील उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी मुलाखतीद्वारे नोकरी इच्छुक उमेदवारांना खाजगी नोकरी/रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे.

         यासाठी इयत्ता १० वी, १२ वी, आय.टी.आय. पदवीधर (इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड), (कला/वाणिज्य/विज्ञान) व इंजिनिअरींग डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रता असणे असणारे व वय १८ ते ४५ वर्षापर्यंतच्या युवक-युवती उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या पदनामांकरीता १६० पेक्षा जास्त रिक्तपदावर रोजगार मिळवण्याची संधी जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना याव्दारे प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांना www.mahaswayam.gov.in वेबपोर्टल ऑनलाईन पध्दतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना त्यांचेकडील सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्ड मधून मेळाव्यात सहभागी होता येईल. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

         रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्याची प्रक्रीया/पध्दत पुढीलप्रमाणे आहे. यासाठी आपणाकडे एम्पॉयमेंट कार्डमधील युझरनेम व पासवर्ड असावे. नसल्यास www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Register वरुन युझरनेम व पासवर्ड मिळवावा त्यानुसार सहभागी होता येईल. त्यानंतर Job Seeker च्या विंडोमध्ये लॉगीन करून डाव्या बाजूकडील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वर क्लीक करावे. येथे आपणांस वाशिम जिल्हा निवडुन त्यातील WASHIM JOB FAIR-1 मध्ये नमुद पात्रतेनुसारच्या पदांवर अप्लाय करावे. त्यावेळी Applied असा मेसेज दिसेल. या पध्दतीने आपण या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी झालेले असाल. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांचे ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क करावा.

                                                                                                                                            *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे