पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत आता १ ऑगस्टपर्यंत
पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत आता १ ऑगस्टपर्यंत
वाशिम दि.३० (जिमाका) प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२२ -२३ च्या खरीप हंगामात विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२२ पर्यंतचा कालावधी निश्चित केला होता.परंतु ३१ जुलै रोजी रविवार हा शासकीय सुट्टीचा दिवस येत असल्याने केंद्र शासनाने मार्गदर्शन सूचनेत व एका पत्रात नमूद केल्याप्रमाणे आता प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत आता १ ऑगस्ट २०२२ अशी निश्चित केली आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन या योजनेत सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment