तिरंगा खरेदी करण्यासाठीअधिकारी-कर्मचाऱ्यांनी अभियानात सहभागी व्हावे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



तिरंगा खरेदी करण्यासाठी

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अभियानात सहभागी व्हावे

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

      वाशिम, दि. 15 (जिमाका) : जिल्हयात हर हर तिरंगा हा उपक्रम 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना स्वतःच्या घरावर राष्ट्र ध्वजाची उभारणी करावी लागणार आहे. तिरंगा हे निशुल्क असणार नसल्यामुळे नागरीकांना स्वेच्छेने विकत घ्यावे लागणार आहे. स्वमर्जीने तिरंगा ध्वज खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांनी स्वेच्छेने या अभियानात सहभागी होऊन निधी गोळा करण्यास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

       भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहून स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक यांच्यासह विविध संघटनांचे स्मरण व्हावे. यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2012 या कालावधीत जिल्ह्यात हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतीवर आणि नागरिकांना स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावी लागणार आहे. त्यासाठी तिरंगा राष्ट्रध्वज नि:शुल्क असणार नाही. नागरिकांना तिरंगा स्वेच्छेने विकत घेण्यासाठी प्रेरीत करावे.

         जिल्हा प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून स्वमर्जीने तिरंगा ध्वज खरेदी करण्यासाठी वर्गणी गोळा करण्यात येणार आहे. वर्ग-अ च्या अधिकाऱ्यांनी दोन हजार रुपये, वर्ग-ब च्या अधिकाऱ्यांनी एक हजार रुपये, वर्ग- क च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाचशे रुपये आणि ड-वर्गाच्या कर्मचाऱ्यांनी स्वइच्छेने देणगी देणे अपेक्षित आहे. विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून तिरंगा खरेदी करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने या अभियानात सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी केले आहे. या अभियानांतर्गत जमा करण्यात आलेल्या निधीचा उपयोग संबंधित कार्यालयामार्फत तिरंगा ध्वज खरेदी करण्यासाठी करण्यात येणार आहे.  

         जिल्हास्तरावरील आणि तालुका स्तरावरील कार्यालयावर तिरंगा उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर कार्यालयात येणारे लोकप्रतिनिधी व अभ्यागतांना सुद्धा तिरंगा ध्वज भेट म्हणून द्यावा. जिल्हाधिकारी कार्यालयातील इमारतीतील विविध यंत्रणांच्या सर्व विभाग प्रमुखांनी तिरंगा ध्वज खरेदीसाठी गोळा करण्यात आलेला निधी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नाझर यांचेकडे जमा करावा.

                                                                                                                                    *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे