उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य "२६ व २७ जुलै रोजी वाशिम व जोगलदरी येथे कार्यक्रम

" उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य "

२६ व २७ जुलै रोजी वाशिम व जोगलदरी येथे कार्यक्रम

     वाशिम, दि. 22 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि महावितरण वाशिमच्या वतीने  जिल्ह्यात " उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य  " अंतर्गत वाशिम आणि जोगलदरी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती वाशिम महावितरणचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य यांनी दिली. 

       जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता " उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य " या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला खासदार भावना गवळी,संजय धोत्रे, आमदार रणजीत पाटील,किरण सरनाईक,वसंत खंडेलवाल,लखन मलीक, राजेंद्र पाटणी,अमित झनक, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, किन्हीराजा जोगलदरीच्या सरपंच सुनिता राठोड, जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोये यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. २७ जुलै रोजी मालेगाव तालुक्यातील जोगलदरी येथील काळामाथा मंदीर येथे " उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य  " हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता होणार आहे. 

      केंद्र आणि राज्य सरकारने मागील वर्षाच्या कालावधीत राबविलेल्या विविध योजनांचे सादरीकरण करून योजनेतील लाभार्थ्यासोबत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी संवाद साधणार आहेत. मागील ८ वर्षाच्या कालावधीत महावितरणकडून राज्यात उच्च दाब वीज वितरण प्रणालीमार्फत शेतकऱ्यांना वीज पुरवठा, दुर्गम आणि ग्रामीण भागातील गावकऱ्यांना सौभाग्य योजनेतून वीज पुरवठा, सौर कृषी पंपाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, महावितरणचे नवीन कृषी धोरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, विलासराव देशमुख अभय योजना आदी. वीज ग्राहक आणि शेतकरी बांधवासाठी व्यक्तीगत योजना या काळात राबविण्यात आल्या. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. दोन्ही कार्यक्रमास वीज ग्राहकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन महावितरणचे अधिक्षक अभियंता मंगेश वैद्य यांनी केले आहे.

                                                                                                                           *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे