जिल्हा न्यायालयात कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न



जिल्हा न्यायालयात कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

     वाशिम, दि. 25 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम व जिल्हा विधीज्ञ संघ, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम यांच्या मार्गदर्शनात नुकतेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. डी. आर. कलवार उपस्थित होते.

        श्री. व्ही. ए. टेकवाणी यांनी उपस्थितांना त्यांचे अधिकाराबद्दल, पोलीसांचे अधिकार व दायीत्व, कायद्याअंतर्गत काय प्रतिबंधीत आहे आणि कशाला परवानगी आहे, न्यायालयामार्फत त्यांच्या अधिकारांची बजावणी कशाप्रकारे करता येईल आणि पोलीसांकडून किंवा तस्करांपासून होणाऱ्या छळाला कशाप्रकारे प्रतिबंध करता येईल याबद्दल कायदेविषयक मार्गदर्शन केले.

        अॅड. श्रीमती पी. एल. वैरागडे यांनी मानव तस्करी आणि व्यावसायीक लैंगीक शोषणाचे बळी नालसा योजना ०१५ याबाबत मार्गदर्शन केले. श्रीमती शुभांगी खडसे यांनी सार्वजनिक उपयोगीता सेवा आणि केंद्र व राज्य शासकीय योजनेबाबत माहिती दिली. उपस्थित महिलांनी शिक्षण घेण्याकरीता तयारी दर्शविली व केंद्र/राज्य शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा याकरीता सकारात्मक प्रतिसाद दिला.
        शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आर. डी. तांगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेंद्र शिंदे, प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती पी. एच. गवळी, पोलीस उपनिरीक्षक स्वाती ईथापे व स्वप्नील सरनाईक यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन व आभार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी मानले. कार्यक्रमाला कायदा व परिवीक्षा अधिकारी जे. एम. चौधरी, जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष सामान्य रुग्णायलय येथील जिल्हा पर्यवेक्षक रवि भिसे, परिवीक्षा अधिकारी गणेश ठाकरे व समाजसेवी संस्थांचे कर्मचारी व महिला यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

                                                                                                                            *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे