25 जुलै रोजी मालेगांव येथे रोजगार मेळावा


25 जुलै रोजी मालेगांव येथे रोजगार मेळावा

     वाशिम, दि. 22 (जिमाका) : नोकरी/रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाच्या वतीने शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालेगांव येथे २५ जुलै रोजी सकाळी १० ते ते दुपारी ४ वाजेपर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

          या मेळाव्यात वाळूज एमआयडीसी, औरंगाबाद येथील संजिव ऑटो, पिट्टी इंजिनिअरींग, एस. एस. सी. कंट्रोल, एन्डूरंस, सिडलर ईलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. या नामांकित कंपन्यांकडून त्यांचे उद्योजक किंवा प्रतिनिधी मेळाव्यात उपस्थित राहून जिल्हयातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देवून तात्काळ प्रभावाने खाजगी नोकरीकरीता या कंपनीत रुजू करुन घेण्यात येणार आहे.

         प्राध्यान्याने आयटीआयचे (सर्व ट्रेडस्) आणि इयत्ता १० वी, १२ वी, पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान), अभियांत्रिकी पदवीधर, इंजिनिअरींग डिप्लोमा (सर्व शाखा) इत्यादी शैक्षणीक पात्रता असणारे उमेदवार त्यांची वयोमर्यादा १८ ते ३८ दरम्यान असावी. याच युवक-युवती उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून विविध प्रकारच्या पदनामांकरीता २०० पेक्षा जास्त पदसंख्येकरीता भरती होणार आहे. या कंपन्यांमध्ये रोजगार मिळविणाऱ्या उमेदवारांना बस व कॅन्टिन ची मोफत व्यवस्था असून मासिक मानधन अंदाजे १० ते १२ हजार रुपये राहणार आहे.

        इच्छुक व पात्र स्त्री-पुरुष उमेदवारांनी 25 जुलै रोजी सकाळी १० वाजता आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स (सर्व मूळ प्रमाणपत्रे), नुकतीच काढलेली २ पासपोर्ट आकाराची फोटो व सेवायोजन (Employment) कार्डसह, स्वखर्चाने प्रत्यक्ष उपस्थित राहावे. सेवायोजन कार्ड नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन  ऑनलाईन करुन प्राप्त करुन घ्यावे.

         जिल्हयातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे. तसेच ऑनलाईन पध्दतीने सुध्दा या जिल्हा रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचे श्री. उगले भ्रमणध्वनी क्र. ७८७५७९८६८४ श्री. भोळसे भ्रमणध्वनी क्र. ९७६४७९४०३७ यांचेशी संपर्क साधावा.

                                                                                                                          *******

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे