रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रिक्तपदे भरण्यासाठी मागणीपत्र सादर करा



रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन

रिक्तपदे भरण्यासाठी मागणीपत्र सादर करा

22 जुलै अंतिम तारीख

       वाशिम, दि. 21 (जिमाका) : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यात अद्यापही रोजगाराचा प्रश्न गंभीरच आहे. अशातच जिल्हयातील काही युवक-युवतींचे विविध ठिकाणच्या उद्योग/आस्थापनांवरील रोजगार गेले आहे. त्यांना आणि इतर रोजगार इच्छुक युवक/युवतींना पुन्हा रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळावा २२ ते २४ जुलै २०२२ या दरम्यान www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आला आहे.

         ऑफलाईन रोजगार मेळावा २५ जुलै रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी एरिया, मालेगांव येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम कार्यालयाकडुन जिल्हयातील नोकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील खाजगी क्षेत्रातील नियोक्ते/आस्थापना प्रमुखांनी आपल्या आस्थापनांवर आवश्यक असणारे मनुष्यबळ पुर्तीकरीता मागणी पत्र सादर करावे. सदर
मागणी पत्रात पदाचे नांव व पदसंख्या, शैक्षणिक/तांत्रिक पात्रता, वयोमर्यादा व मानधन इत्यादी बाबींचा अंतर्भाव करावा.
ज्या खाजगी आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावयाचे आहे, त्यांनी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 07252-231494 यावर संपर्क करुन washimrojgar@gmail.com या ई-मेलवर २२ जुलै २०२२ पुर्वी मागणीपत्र सादर करावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

                                                                                                                                           *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे