काटेपूर्णा अभयारण्यात जागतिक व्याघ्र दिवस उत्साहात साजरा

काटेपूर्णा अभयारण्यात जागतिक व्याघ्र दिवस उत्साहात साजरा
 
वाशिम दि.२९(जिमाका) वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, त्याबाबत जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे हा जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यामागील उद्देशाने आज २९ जुलै रोजी शेलुबाजार येथील लक्ष्मीचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन काटेपूर्णा अभयारण्याच्या वतीने करण्यात आले.
          यानिमित्ताने सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी अभयारण्यातील निसर्ग पाऊलवाटांवर भ्रमंती केली.भ्रमंतीदरम्यान काटेपूर्णा अभयारण्यातील विविध प्राणी,पक्षी व झाडे यांची ओळख गाईड यांनी करून दिली.
        सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना स्लाईड शोच्या माध्यमातून काटेपूर्णा अभयारण्याबाबत माहिती तसेच व्याघ्र दिवसाचे महत्व काटेपूर्णा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी पटवून दिले. त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या जीवनावर आधारित " टायगर सिस्टर ऑफ तेलिया " ही ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. प्राणी व मानवी जीवन याचा संबंध या माहितीपटाच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडण्यात आला.
 काटेपूर्णा अभयारण्याचे वनपाल एन. डी. तुपकर तसेच वनोजा येथील श्रीमती.साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे सदस्य व निसर्गप्रेमी आदित्य इंगोले यांनी पर्यावरण व जंगलाचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
             कार्यक्रमाकरिता लक्ष्मीचंद महाविद्यालयाचे प्रा. विनोद भगत, श्रीकृष्ण निकम,शुभम डोफेकर तसेच अभयारण्याचे वनरक्षक निलेश खोडके तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी व काटेपूर्णा अभयारण्याचे गाईड,सर्व वनकर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार वनरक्षक अविनाश वानखडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काटेपूर्णा अभयारण्याचे सर्व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे