जिल्हयात अतिसार नियंत्रण पंधरवाडा शुभारंभ



जिल्हयात अतिसार नियंत्रण पंधरवाडा शुभारंभ

        वाशिम, दि. 01(जिमाका) : जिल्हयात अतिसार नियंत्रण पंधरवाडा १ ते १५ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरीता जिल्हयात ग्रामीण भागात ८१ हजार ३६३, शहरी भागात १८ हजार २६६ अशी एकूण ९९ हजार ६२९ एवढी 0 ते ५ वर्षे वयोगटातील अपेक्षीत लाभार्थी संख्या आहे.या कार्यक्रमात जनजागृती व अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी,ओआरएस व झिंक गोळया यांचा वापर कसा करावयाचा याची प्रात्यक्षिके, ओआरएस झिंक या गोळयांचे घरोघरी वाटप करणे,आरोग्य संस्थांमध्ये ओआरएस व झिंक कॉर्नर स्थापन करणे आहे.या कार्यक्रमामध्ये आरोग्य विभागाबरोबरच महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण विभाग व पाणिपुरवठा विभाग यांच्या समन्वयाने तसेच आयएपी,आयएमए, जिल्हास्तरीय युनिसेफ सल्लागार यांचे सहकार्य अपेक्षीत आहे.आयडीसीएफ कार्यक्रमांतर्गत जिल्हयामध्ये 0 ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी हे प्रत्येक गांवामध्ये परोघरी भेट देवून सर्व्हेक्षण करणार आहेत. घरभेटीमध्ये 0 ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचा सर्व्हे करून प्रत्येक घरी ओआरएस पॉकीट व ज्या बालकांना अतिसाराची लागण झालेली आहे अशा बालकांना ओआरएस पॉकीट व १४ दिवसाच्या झिंक गोळया वयोमानानुसार देण्यात येणार आहे.ओआरएसचे द्रावण तयार करून पालकांना त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे. सर्व कुटुंबियांना आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी हे स्वच्छतेचे व निर्जंतुकीकरणाचे प्रात्यक्षिक करून दाखविणार आहेत.या अभियानात दुर्गम भाग,विटभट्टी, झोपडपट्टी, दुर्लक्षीत व जोखमीच्या भागातील बालकांवर विशेष लक्ष केंद्रीत केल्या जाणार आहे. तसेच सर्व आरोग्य संस्थेमध्ये ओआरएस व झिंक कोपरा ( कॉर्नर) प्रस्थापीत करणे व अंगणवाडी,शाळांमध्ये हात धुण्याबाबतचे प्रात्यक्षिक करणे व अमलात आणणे इत्यादी बाबी करण्यात येणार आहे.

          त्या अनुषंगाने आज १ जुलै २०२२ रोजी शहरी नागरी केंद्र, वाशिम येथे अतिसार नियंत्रण पंधरवाडाचे उद्घाटन आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. मिलींद जाधव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा चव्हाण, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक श्री.राजुरकर, शहरी नागरी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकरे, डॉ. मनवर,डॉ. श्रीमती कांबळे,आरोग्य सहाय्यक श्री. सोनोने,औषध निर्माण अधिकारी श्री. साबळे,श्रीमती आशाताई यांची उपस्थिती होती.या कालावधीत कार्यक्षेत्रामधील १ ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना ओआरएस पॉकीटे घरोघरी जावून वितरण करण्यात येणार आहे. ज्या बालकांना अतिसाराची लागण झाली आहे त्यांना झिंकाच्या गोळया देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे