शासकीय वसतीगृह प्रवेश 30 जुलैपर्यंत अर्ज मागविले
- Get link
- X
- Other Apps
शासकीय वसतीगृह प्रवेश
30 जुलैपर्यंत अर्ज मागविले
वाशिम, दि. ०6 (जिमाका) : गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, नालंदा नगर, वाशिम या शासकीय वसतीगृहामध्ये सन 2022-23 या शैक्षणीक सत्राकरीता रिक्त असलेल्या जागी जातीनिहाय असलेल्या आरक्षणानुसार, गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे व त्यासाठी प्रवेश अर्ज वाटप सुरू आहे. वसतीगृहास अर्ज सादर करण्याचा अंतीम दिनांक 30 जुलै 2022 आहे.
सन 2022-23 साठी रिक्त असलेल्या प्रवर्गनिहाय जागा अनुसूचीत जातीसाठी 47 जागा, अनुसूचीत जमाती 2 जागा, विमुक्त जाती भटक्या जमाती 2 जागा, विशेष मागास प्रवर्ग 2 जागा, अनाथ (कोणत्याही जातीचा) 3 जागा व अपंग (कोणत्याही जातीचा) 2 जागा अशा एकूण 58 रिक्त जागा भरावयाच्या आहे.
प्रवेशासाठी असलेल्या अटी व पात्रता पुढीलप्रमाणे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहीवाशी असावा. विद्यार्थी किमान 75 टक्के गुण मिळवून जून 2022 मध्येच इयता 10 वी उत्तीर्ण असावा. एकूण मान्य संख्या 100 त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 80 टक्के, इतर मागासवर्ग आणि विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी प्रत्येकी 5 टक्के, अनुसूचित जमातीसाठी 3 टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी 2 टक्के, अनाथ 3 टक्के व अपंगासाठी 2 टक्के असा राहील. विद्यार्थी हा वाशिम शहरातील महाविद्यालयात इयता 11 वी किंवा पॉलीटेक्नीक व आयटीआयच्या प्रथम वर्षात प्रवेशीत असावा. आयटीआय 2 वर्षांचा अभ्यासक्रम आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीसाठी रुपये 2 लाख आणि विशेष मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी 1 लाख रुपयाच्या आत असावे.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायांकीत प्रत, इयता 10 वीच्या गुणपत्रिकेची छायांकीत प्रत, उत्पन्नाचा दाखला मुळ प्रत, जातीच्या दाखल्याची छायांकीत प्रत, ग्रामसेवकाचा रहीवाशी दाखला, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे बोनाफाईड मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे.
प्रवेशीत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा, शासकीय नियमानुसार विनामुल्य सकाळी एकवेळ नाश्ता व दोन वेळ भोजन, विनामुल्य निवास व्यवस्था (एका खोलीमध्ये फक्त 4 विद्यार्थी) एकूण 25 खोल्या, (पलंग व अंथरूण पांघरुणासह), प्रत्येक खोलीमध्ये शौचालय व स्नानगृह, स्नानगृहामध्ये गरम पाण्याची सुविधा, विनामुल्य शैक्षणीक साहित्य, दरमहा रुपये 600 रुपये निर्वाह भत्ता, गणवेशासाठी 2000 रुपये, विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन कक्ष, अभ्यासिका, ई-लायब्ररी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नियंत्रण. पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी व विद्यार्थ्यांसाठी अद्यावत व्यायामशाळा उपलब्ध आहे. प्रवेशासाठी अर्ज वाटप सुरू आहे. गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, नालंदा नगर, वाशिम येथे संपर्कासाठी गृहपाल, एस. एस. इंगोले यांचे 9823705385/ 9359203904 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment