सखल भागातील आणि नदी-नाले व ओढयाच्या काठावरील नागरीकांनी सतर्क राहावे



सखल भागातील आणि नदी-नाले व ओढयाच्या काठावरील

नागरीकांनी सतर्क राहावे

       वाशिम, दि. 20 (जिमाका) : वाशिम तालुक्यात सखल भागात राहणाऱ्या नागरीकांनी संततधार पावसामुळे  पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचे लक्षात येताच तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे. नदी नाले व ओढयाकाठच्या नागरीकांनी देखील सतर्क राहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरीकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर राहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा नाल्यावरील पुलांवरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीचा आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भुस्खलन होण्याची व दरड कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरीकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदीच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू व उतरु नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असतांना झाडाच्या खाली न थांबता सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. प्रत्येक नागरीकांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये दामीनी ॲप डाऊनलोड करावा.

          आपतकालीन परिस्थीतीत जवळचे तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. नैसर्गिक आपत्ती संदर्भात काही समस्या निर्माण झाल्यास नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष, वाशिम दूरध्वनी क्रमांक 07252-232008, तहसिलदार, वाशिम भ्रमणध्वनी क्रमांक 9028383599, पोलीस निरीक्षक, वाशिम (ग्रामीण) 9921516866, पोलीस निरीक्षक, वाशिम (शहर) 9922799027, पोलीस निरीक्षक, अनसिंग 8888838228, पोलीस निरीक्षक, जऊळका 8149407275, पोलीस निरीक्षक, आसेगांव 9130005618 व मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम यांच्या 7588030333 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे तहसिलदार तथा अध्यक्ष, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती, वाशिम यांनी कळविले आहे.    

                                                                                                                                           *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे