असंघटित कामगारांनी श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापार्‍यांनी राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा कामगार विभागाचे आवाहन

असंघटित कामगारांनी श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापार्‍यांनी राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा

कामगार विभागाचे आवाहन

वाशिम दि,13(जिमाका) नागरी सुविधा केंद्रामार्फत असंघटित कामगारांची प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लघु व्यापाऱ्यांची नोंदणी करण्यात येते.योजनेचा लाभ मिळण्यासाठी असंघटित कामगार हा 18 ते 40 वर्ष वयोगटातील असावा. त्याचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.तो भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सदस्य नसावा. आयकर भरणारा नसावा.
        लघु व्यापारी हा राष्ट्रीय निवृत्ती योजनेच्या लाभासाठी स्वयंरोजगारीत असावा.त्याचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे.उद्योग/व्यवसायाची वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपयांच्या आत असावी.तो आयकर भरणारा नसावा.
        असंघटित कामगार आणि लघु व्यापारी यांच्याकडून त्यांच्या वयानुसार मासिक वर्गणी 55 रुपये ते 200 रुपये वयाच्या 40 वर्ष पूर्ण होईपर्यंत घेण्यात येते.या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत असंघटित कामगारांची नोंदणी करून त्यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यासाठी येते.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त असंघटित कामगारांनी  आणि लघु व्यापाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे