अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी 7 लक्ष 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज योजना
- Get link
- X
- Other Apps
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी
7 लक्ष 50 हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज योजना
वाशिम, दि. 25 (जिमाका) : मुस्लिम, बौद्ध, शीख, पारसी, ख्रिश्चन, जैन व ज्यू या अल्पसंख्यांक समुदयातील गरजू विध्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या इंजीनियरिंग, मेडिकल, पॉलटेक्नीक अभियांत्रिकी, नर्सिंग, फॅशन डिझायनिंग, टुरिझम, पत्रकारिता, हॉटेल मॅनेजमेंट, मास मिडिया, अॅनिमेशन व चित्रपट निर्मिती या संबंधी विविध व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत ७ लाख ५० हजार रुपयापर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ऑनलाइन अर्जाकरिता
https://www.malms.maharashtra.
संपर्कासाठी व अर्ज सादर करण्यासाठी मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ नवीन आयु.डी.पी.कॉलनी, आय.टी.आय.कॉलेज समोर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. या योजनेचा जास्तीत जास्त अल्पसंखायांक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन महामंडळाच्या प्रभारी जिल्हा व्यवस्थापक कविता कांबळे यांनी केले आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment