फळबाग व फुलशेती लागवडीसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करावे
- Get link
- X
- Other Apps
फळबाग व फुलशेती लागवडीसाठी
लाभार्थ्यांनी अर्ज करावे
वाशिम, दि. 21 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग व फुलशेती लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. फळबाग योजनेअंतर्गत लाभार्थी दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ घेऊ शकतात. या योजनेकरीता तीन वर्षात शंभर टक्के अनुदान देण्यात येते. लाभार्थ्यांची निवड कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता अर्ज करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.
फळबाग लागवडीचा कालावधी 1 जून ते 31 डिसेंबरपर्यंत योग्य असतो. सिंचनाची व्यवस्था असल्यास वर्षभरात केंव्हाही लागवड करता येते. यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉब कर्डधारक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जमाती) दारिद्रय रेषेखालील इतर कुटूंब, स्त्री प्रमुख असलेली कुटूंब, दिव्यांग व्यक्ती प्रमुख असलेली कुटूंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व इतर पारंपारीक वनवासी (वन हक्के मान्य करणे) अधिनियम 2006 (2007 चे 2) पात्र लाभार्थी आदी लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात आल्यानंतर कृषी कर्ज माफी योजना 2008 नुसार अल्पभूधारक व सिमांत शेतकरी या योजनेचा वैयक्तिक लाभार्थी म्हणून लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्याकरीता इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रुम क्रमांक 212, प्रशासकीय इमारत, वाशिम येथे किंवा nhmwashim@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment