15 जुलैपासून 18 वर्षावरील लाभार्थ्यांना बुस्टर डोस

15 जुलैपासून 18 वर्षावरील

लाभार्थ्यांना बुस्टर डोस

      वाशिम, दि. 14 (जिमाका) : कोविड-19 लसीकरणाअंतर्गत 15 जुलै 2022 पासून 18 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना कोविड-19 लसीकरणाच्या बुस्टर डोसला (तिसरा डोस) सुरुवात होत आहे. हा कार्यक्रम 75 दिवस चालणार आहे. या 75 दिवसामध्ये बुस्टर डोससाठी पात्र असलेले लाभार्थी ज्यांना दुसरा डोस घेवून 6 महिने पुर्ण झाले आहे. ज्यांनी कोव्हॅक्सीन किंवा कोविशिल्ड लस घेतलेली आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना सर्व लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे