सावरगाव( जिरे ) येथे शेतकऱ्यांच्या बांधावरची प्रयोगशाळेचे उदघाटन


सावरगाव( जिरे )येथे शेतकऱ्यांच्या बांधावरची प्रयोगशाळेचे उदघाटन

वाशिम दि.०४(जिमाका) वाशिम तालुक्यातील सावरगाव (जिरे) येथे मानव विकास मिशन अंतर्गत तयार  करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरच्या प्रयोगशाळेच्या उद्धाटन आज ४ जुलै रोजी मानव विकास मिशनचे आयुक्त नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर,तंत्र अधिकारी श्री कंकाळ, तंत्र अधिकारी श्री सावंत, फार्म लॅब संकल्पनेचे निर्माते डॉ. चव्हाण पुणे, प्रतिष्ठित नागरिक  गंगाराम पडघन, माजी पंचायत समिती सभापती गजानन भोने,फार्म लॅब एरंडा येथील विजय घुगे,दीपक घुगे,मनोहर सांगळे, सतीश कुरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        उद्घाटन प्रसंगी बोलताना मानव विकास मिशनचे आयुक्त श्री पाटील यांनी शेतीच्या बांधावरची प्रयोगशाळा या आधुनिक नाविन्यपूर्ण उपक्रमातून खऱ्या अर्थाने शेतकरी संशोधक होत आहे. ही संकल्पना राज्यालाच नव्हे तर देशाला दिशादर्शक ठरेल असे ते म्हणाले.यामुळे शेतकऱ्यांना गावातच जैविक निवीष्ठा उपलब्ध होतील. त्यामुळे सहजपणे शेतकऱ्यांचा कल विषमुक्त शेतीकडे वाढेल.शेतीला लागणारा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल तसेच यापासून शेतकरी गटाचेही उत्पन्न वाढेल असे ते म्हणाले.
             जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावर यांनी फार्म लॅब या संकल्पनेतून शेतकऱ्यांना आपल्या निविष्ठा आपणच तयार करून शेतीचा खर्च कमी करता येईल तसेच विषमुक्त सात्विक अन्न उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होईल असे त्यांनी सांगितले. या उपक्रमास मानव विकास मिशनच्या नाविन्यपूर्ण योजनेतून अर्थसहाय्य केल्याबद्दल मानव विकास मिशन आयुक्त श्री पाटील यांचे आभार मानले.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, आदर्श शेतकरी बबनराव कोल्हे,अजय बीटोडे , फकीरा वानखेडे ,गजानन वानखेडे दत्ता नागुलकर,रामजी वानखेडे, दिलीप काळे, पोलीस पाटील काशीराम तडस,श्री अडबणेश्वर शेतकरी बचत गटाचे सुनील कोल्हे, अशोक बिटोडे, अमोल वानखेडे, कैलास वानखेडे, सुनील वानखेडे, गणेश वानखेडे, गणेश हेंबाडे, पांडुरंग वानखेडे, विष्णू वानखेडे, अनिल वानखेडे, राजू अस्तरकर, महादेव वानखेडे, रवि वानखेडे, महेंद्र अंभोरे, धोंडू अंभोरे,आकाश बिटोडे यांचे सहकार्य लाभले.  या ठिकाणी महिला बचतगटांनी भेट देऊन मानवचलित बीज प्रक्रिया सयंत्र पाहणी करण्यात आली.महिला बचत गटाच्या वैशाली  तडस, सुमन पायघन यांनी बीज प्रक्रिया सयंत्र यापासून गटाचे उत्पादन  वाढले या विषयी माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे