जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बचतगटांना भाजीपाला बियाणे मिनी किटचे वाटप



जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते

बचतगटांना भाजीपाला बियाणे मिनी किटचे वाटप

     वाशिम, दि. 01 (जिमाका) :   आज जिल्हयाच्या निर्मित्तीला 24 वर्षे पुर्ण झाली आहे. हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आत्मा अंतर्गत पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना जिल्हाभर राबविण्यात येत आहे. आज 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात महिला बचतगट व अनुसूचित जाती महिला शेतकरी बचत गटातील २० लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते भाजीपाला बियाणे मिनी किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

         या कार्यक्रमांतर्गत एक गुंठा क्षेत्रावर विषमुक्त भाजीपाला लागवड करून पोषणयुक्त व सुरक्षित अन्नाचा पुरवठा करणे, संतुलित अन्नाचा पुरवठा करणे, विषमुक्त सुरक्षित अन्नाचा पुरवठा करणे व ग्रामीण भागातील पोषणमूल्य अभावी होणारे कुपोषण कमी करणे असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमध्ये पन्नास टक्के महिला लाभार्थी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात निवड करून महिला बचत गट व आत्माअंतर्गत नोंदणीकृत गटांना प्राधान्याने भाजीपाला मिनी किट वाटप केल्या जाणार आहे. भाजीपाला किटमध्ये भोपळा, शिरी दोडका, चोपडा दोडका, भेंडी, चवळी, मेथी, गांजर, गवार, मिरची, कोथिंबीर अशा दहा भाज्यांच्या बियाण्याचा समावेश आहे.

        यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदिप महाजन, सुहासिनी गोणेवार, नितीन चव्हाण, कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, अधिक्षक राहूल वानखेडे, कृषी आयुक्तालय पुणे येथील तंत्र अधिकारी राहुल माने, तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे