उमेद अभियानांतर्गत बँक कार्यशाळा संपन्न
- Get link
- X
- Other Apps
उमेद अभियानांतर्गत बँक कार्यशाळा संपन्न
वाशिम, दि. 15 (जिमाका) : उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हयातील बँक शाखा व्यवस्थापकांची एकदिवशीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून खंडबाराव दिक्षीत उपस्थिती होते. कार्यशाळेचे उदघाटन प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखेडे यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार व जिल्हा अग्रणी व्यवस्थापक दिनेश बारापात्रे यांची उपस्थिती होती.
मुख्य प्रशिक्षक श्री. दिक्षीत यांनी उमेद अभियानाचे उदिष्ट, उमेदचा बँकेशी असलेले संबंध, वित्तीय समावेशनामध्ये उमेद अभियानाअंतर्गत येणाऱ्या समुहांची खाते कशी उघडावी, समूहांना कर्ज कशा पध्दतीने दयावे, त्यांची कागदपत्रे काय असावीत, समुहाचे कर्ज प्रस्ताव ऑनलाईन मंजूर कसे करावेत. सनसमर्थ पोर्टलबद्दल माहिती देऊन विविध मुद्यांवर उपस्थितांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणाचा लाभ जिल्हयातील 10 हजार बचतगट समूहांना होणार आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment