सोयाबीन पिकात खाडे भरण्याचे व विरळणीचे काम या आठवडयात पूर्ण करा कृषी विभागाचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
सोयाबीन पिकात खाडे भरण्याचे व विरळणीचे
काम या आठवडयात पूर्ण करा
कृषी विभागाचे आवाहन
वाशिम, दि. 04 (जिमाका) : जिल्हयात सोयाबीन पिकांच्या पेरण्या जवळपास आटोपत आल्या आहेत. बहुतेक ठिकाणी पिकांची उगवण झाली आहे. पिकांच्या उगवणीमध्ये काही ठिकाणी खाडे पडण्याची शक्यता असते. अशा खाडे पडलेल्या ठिकाणची जागा रिकामी राहून तणाची वाढ होते. त्याचबरोबर हेक्टरी रोपाची संख्या कमी झाल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नाही. याकरीता या आठवडयात सोयाबीन पिकामध्ये खाडे भरण्याचे काम पुर्ण करावे.
सोयाबीन पिकामध्ये खाडे भरण्याकरीता आदल्या दिवशी लागवडीपुर्वी २४ तास स्वच्छ गोणपाट ओला करुन बियाण्यास रासायनिक बिज प्रक्रिया करुन सोयाबीन बियाणे गुंडाळुन ठेवावे. सकाळी खाडे भरण्याकरिता सुरकुत्या पडलेल्या बियाण्यांचा वापर करावा. त्यामुळे बियाणे उगवण लवकर होण्यास मदत होईल. तसेच ज्या ठिकाणी जास्त रोपांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी रोपांची विरळणी करावी. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या आठवडयात सोयाबीन पिकामध्ये खाडे भरण्याचे व विरळणीचे काम पुर्ण करावे .असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment