उच्च दुग्ध उत्पादनासाठी गाई व म्हशींची नोंदणी करा
- Get link
- X
- Other Apps
उच्च दुग्ध उत्पादनासाठी
गाई व म्हशींची नोंदणी करा
पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
वाशिम, दि. 21 (जिमाका) : गाई व म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेश अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम ही योजना राज्यात सन 2013-14 पासून रबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी उच्च दुग्ध उत्पादन क्षमतेच्या गाई व म्हशींची नोंदणी करण्यात येते. तालुका व जिल्हास्तरावर दुग्ध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या गाई व म्हशींना उच्च वंशावळीच्या वळूच्या रेतमात्रांनी कृत्रिम रेतन करण्यात येते व जन्मलेल्या वासरांची निगा राखण्याकरीता मापदंडानुसार प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत पशुपालकांकडे असलेल्या उच्च दुग्ध उत्पादन क्षमतेच्या गाई व म्हशींची नोंदणी करण्याकरीता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, वाशिम यांनी केले आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment